Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन उर्फीला भेटला बॉयफ्रेंड; नेटकरी म्हणाले... त्याला कपड्यांवर खर्च करावा लागणार नाही

उर्फीला भेटला बॉयफ्रेंड; नेटकरी म्हणाले… त्याला कपड्यांवर खर्च करावा लागणार नाही

Subscribe

आपल्या अतरंगी स्टाईलमुळे सतत चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदच्या अनोख्या स्टाईलचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. अनेकजण तिच्या हटके स्टाईलचं कौतुक करतात तर काहीजण तिला प्रचंड ट्रोल देखील करत असतात. मात्र, उर्फी कोणालाही न घाबरता आपली फॅशन आणि कपडे यांच्यात कोणताच बदल करत नाही. आपल्या अतरंगी फॅशनमुळे चर्चेत असणारी उर्फी आता तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे. उर्फीने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

उर्फीचं ट्ववीट चर्चेत

उर्फीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये एक फोटो शेअर केला आहे. या शेअर केलेल्या फोटोमध्ये फुलांचा गुच्छ दिसत आहे आणि त्याच्या पुढे एक कार्ड ठेवलेले आहे. या कार्डवर ‘तो हो म्हणाला’ (He Said Yes) असं लिहिलं आहे. शिवाय या फोटोवर रेड हार्ट इमोजीही बनवण्यात आले आहे. उर्फीच्या या पोस्टनंतर नेटकरी अनेक तर्क-वितर्क लावू लागले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, सध्या उर्फीची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. नेटकरी तुला हो म्हणणारा मुलगा कोण आहे असे प्रश्न विचारु लागले आहेत. नेटकऱ्यांपैकी एकाने लिहिलंय की, “बरं आहे, बिचाऱ्याला उर्फीसाठी कपड्यांवर खर्च करावा लागणार नाही” तर दुसऱ्याने लिहिलंय, “कोण आहे? कोणाची एवढी हिम्मत जो तुला हो म्हणाला”. तर इतर काहीजण उर्फीची खिल्ली उडवू लागले आहेत.


हेही वाचा :

‘सरी’ चित्रपट येत्या 5 मे रोजी होणार प्रदर्शित

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -