घर मनोरंजन उर्फीने घातला चक्क च्युंइगमचा टॉप; ट्रोलर्सने उडवली खिल्ली

उर्फीने घातला चक्क च्युंइगमचा टॉप; ट्रोलर्सने उडवली खिल्ली

Subscribe

आपल्या अतरंगी स्टाईलमुळे सतत चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदच्या अनोख्या स्टाईलचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. अनेकजण तिच्या हटके स्टाईलचं कौतुक करतात तर काहीजण तिला प्रचंड ट्रोल देखील करत असतात. मात्र, उर्फी कोणालाही न घाबरता आपली फॅशन आणि कपडे यांच्यात कोणताच बदल करत नाही. दरम्यान, आता अशातच उर्फी आणखी एक आगळा-वेगळा लूक शेअर केला आहे. ज्यात तिने चक्क च्युंइगमपासून तयार केलेला टॉप परिधान केला आहे.

उर्फीने घातला च्युंइगमपासून तयार केलेला टॉप

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

प्रत्येक वेळी प्रमाणे यावेळी देखील अतरंगी लूक करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिल्ला. उर्फीने नुकताच च्युंइगमपासून तयार केलेला टॉप परिधान केला आहे. या लूकमधील फोटो शेअर करत खाली कॅप्शनमध्ये उर्फीने लिहिलंय की, “द बबलगम टॉप, मेड फ्रॉम च्युइंगगम”

- Advertisement -

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर उर्फीचा हा फोटो प्रचंड व्हायरल होत असून उर्फीला नेटकरी ट्रोल करु लागले आहेत. ज्यात एका नेटकऱ्याने लिहिलंय की, “इतने च्युइंगगम चबाए कैसे… अकेले उर्फी ने या पूर्ण टीम ने” तर दुसऱ्याने लिहिलंय की , “अगली बार पान या गुटका ड्रॉय करना” तर काहीजण उर्फीच्या लूकवर अनेक विनोदी कमेंट करत आहेत.


हेही वाचा :

‘आदिपुरुष’ ट्रेलर लॉंचपूर्वी प्रभास आणि कृती दिसले एकत्र

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -