घरमनोरंजनबहिणीच्या सिंपल लूकपुढे उर्फीचा बोल्ड अंदाज पडला फिका; नेटकऱ्यांकडून कौतुक

बहिणीच्या सिंपल लूकपुढे उर्फीचा बोल्ड अंदाज पडला फिका; नेटकऱ्यांकडून कौतुक

Subscribe

मॉडेल उर्फी जावेद नेहमीच तिच्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत असते. तिच्या या कपड्यांमुळे आत्तापर्यंत अनेकांनी उर्फीला ट्रोल देखील केलं आहे. मात्र, तरीही उर्फीवर कोणताच परिणाम होत नाही. अशातच उर्फीची आणखी एक स्टाईल समोर आली आहे. पण यावेळी अनेकांच्या नजरा उर्फीवर न पडता तिच्या बहीणीवर खिळल्या आहेत. उर्फीची बहिण डॉली जावेदच्या सिम्पल लूकपुढे उर्फीचा बोल्ड लूक फिका पडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

नुकत्याच एक-दोन दिवसांपूर्वी उर्फी एका फॅशन स्टोअर लॉन्च पार्टीमध्ये पोहोचली होती. यावेळचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी तिच्यासोबत तिची बहिण डॉली जावेद देखील होती. पार्टीमध्ये जाण्यासाठी उर्फीने नेहमी सारखा अतरंगी बोल्ड लूक केला होता. पण यावेळी तिच्याकडे कोणीही फारसे लक्ष दिले नाही. यावेळी उर्फीसोबत असलेली तिची बहिण डॉलीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. डॉलीने पिवळ्या रंगाची सिंपल साडी नेसली होती आणि त्यावर त्याच रंगाचा स्टायलीश ब्लाऊज घातला होता. सिंपल मेअकप आणि कानातले घातले होते. डॉलीचा हा सिंपल अनेकांना आवडला त्यामुळे उर्फीकडे फारसे कोणाचे लक्ष गेले नाही.

- Advertisement -

सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. उर्फीपेक्षा डॉली खूप सुंदर दिसत असल्याचं अनेक नेटकरी म्हणत आहेत. अनेकांनी उर्फीच्या बहिणीला संस्कारी म्हटलं आहे.


हेही वाचा :

नवाजुद्दीन सिद्दीकीने पत्नीसह मुलांना देखील काढलं घराबाहेर; व्हिडीओ व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -