घरमनोरंजनउर्फीचा विचित्र ड्रेस पाहून ट्रोलर्सला आलं हसू

उर्फीचा विचित्र ड्रेस पाहून ट्रोलर्सला आलं हसू

Subscribe

आपल्या अतरंगी स्टाईलमुळे सतत चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदच्या अनोख्या स्टाईलचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. अनेकजण तिच्या हटके स्टाईलचं कौतुक करतात तर काहीजण तिला प्रचंड ट्रोल देखील करत असतात. मात्र, उर्फी कोणालाही न घाबरता सडेतोड उत्तर देताना दिसते. दरम्यान अशातच, उर्फीचा आणखी एक नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने गुलाबी रंगाचा विचित्र ड्रेस परिधान केला आहे.

उर्फीचा विचित्र ड्रेस पाहा

उर्फी जावेदचा हा ड्रेस खूपच विचित्र आहे

- Advertisement -

सतत चित्र-विचित्र लूक्समुळे चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदने पुन्हा एकदा अतरंगी लूक केला आहे. त्यामध्ये तिने गुलाबी रंगाचे त्रिकोणी कोन अंगाला लावले आहेत. शिवाय हा ड्रेस बॅकलेस आहे. उर्फीला या लूकमध्ये पाहून अनेकजण तिची खिल्ली उडवत आहेत. तर काहीजण तिच्या फॅशन सेन्सचं कौतुक करत आहेत.

‘बिग बॉस ओटीटी 2’ मध्ये पाहुणी म्हणून एंट्री

उर्फीने बिग बॉस ओटीटीमधून प्रसिद्धी मिळाली. उर्फी ही बिग बॉसमध्ये फार काळ नव्हती. पण, बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर उर्फीने वेगळ्या फॅशन सेन्सने सर्वांचे लक्ष वेधले. यानंतर उर्फीला सोशल मीडियावर अल्पावधीत प्रसिद्धी मिळाली. नुकतेच उर्फीने ‘बिग बॉस ओटीटी 2’ मध्ये पाहुणी म्हणून एंट्री घेतली होती.


हेही वाचा : Esha Deol Divorce :’घरात शॉर्ट्स घालणं म्हणजे’… ईशा देओलने मांडली व्यथा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -