‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतून उर्मिला कोठारे घेणार एक्झिट; ‘हे’ आहे कारण

'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेतून उर्मिलाने जवळपास १२ वर्षांनी टेलिव्हिजनवर पुनरागमन केले. मात्र आता उर्मिला मालिकेतून एक्झिट घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका महिन्याभरापूर्वी प्रदर्शित झाली आहे. अवघ्या कमी काळात ही मालिका प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. मालिकेतील स्वरा आणि तिच्या आईची भूमिका साकरणारी अभिनेत्री उर्मिला कोठारेने या मालिकेला चारचाँद लावलेले आहेत. मालिकेत सतत घडणाऱ्या ट्विस्टमुळे मालिका दिवसेंदिवस उत्सुकता वाढवत आहे. मात्र आता या मालिकेतून अभिनेत्री उर्मिला कोठारेची एक्झिट घेणार असल्याची बातमी समोर आली आहे.

‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेमध्ये गाण्याची आवड असणाऱ्या एका लहान स्वरा नावाच्या मुलीची गोष्ट दाखवण्यात आली आहे. उर्मिला या मालिकेत स्वराच्या आईची भूमिका साकारत होती. मात्र आता उर्मिला या मालिकेतून एक्झिट घेणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये उर्मिलाला कॅन्सर झाल्याचे दिसत आहे. लवकर उपचार न झाल्याने मालिकेत उर्मिलाचा मृत्यू होणार आहे. त्यानंतर उर्मिला मालिकेतून एक्झिट घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मात्र उर्मिला मालिकेतून एक्झिट होणार असल्याची बातमी कळताच चाहते निराश झाले आहेत. ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून उर्मिलाने जवळपास १२ वर्षांनी टेलिव्हिजनवर पुनरागमन केले आहे. या मालिकेत गाण्याची आवड असणाऱ्या एका लहान मुलीचा आणि तिच्या आईचा संघर्ष दाखवण्यात येत आहे. शूट दरम्यानचे अनेक फोटो , व्हिडिओ उर्मिला सोशल मीडियावर शेअर करते. उर्मिलाने मालिकेत वैदेही ही भूमिका साकारली होती. मात्र वैदेहीचा मालिकेत मृत्यू झाल्याने उर्मिला मालिकेतून एक्झिट घेणार आहे.

 

 


हेही वाचा  :http://Shah Rukh Khan आणि Nayanthara च्या नव्या चित्रपटाचे ‘हे’ नाव करण्यात आले फायनल