Urmila Matondkar Birthday : उर्मिला मातोंडकरने ‘या’ सिनेमातून केली करिअरला सुरुवात

जेव्हा चित्रपट रंगीलाचे नाव येते तेव्हा प्रेक्षकांना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा आज वाढदिवस असून, ती 48 वर्षांची झाली आहे. उर्मिलाच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचे झाले तर तिने अनेक बॉलिवूड सुपरस्टार्ससोबत काम केले आहे आणि इंडस्ट्रीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आजही उर्मिलाच्या मनमोहक अदांचे अनेक चाहते आहेत.

Urmila Matondkar Birthday: Urmila Matondkar started her career in Malayalam cinema
Urmila Matondkar Birthday : उर्मिला मातोंडकरने 'या' सिनेमातून केली करिअरला सुरुवात

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा आज वाढदिवस असून, ती 48 वर्षांची झाली आहे. उर्मिलाच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचे झाले तर तिने अनेक बॉलिवूड सुपरस्टार्ससोबत काम केले आहे आणि इंडस्ट्रीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आजही उर्मिलाच्या मनमोहक अदांचे अनेक चाहते आहेत. उर्मिला लहानपणापासून बालकलाकार म्हणून काम करत आहे.

गुलजार यांच्या ‘मासूम’ या चित्रपटातून उत्तम अभिनयाने प्रेक्षकांचे मनं जिंकली आहेत.’चाणक्य’ या मल्याळम चित्रपटातून तिने नायिका म्हणून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र, शाहरुख खानसोबत ‘चमत्कार’ या चित्रपटातून काम करुन आपल्या अभिनयातून ठसा उमटवला होता. तसेच, ‘रंगीला’ या सुपरहिट चित्रपट आहे ज्यामध्ये ती आमिर खानच्या बरोबर होती. जेव्हा चित्रपट रंगीलाचे नाव येते तेव्हा प्रेक्षकांना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. याशिवाय तिने अनिल कपूरसोबत जुदाईमध्ये दमदार अभिनय केला होता.

उर्मिला मातोंडकरने 2016 मध्ये काश्मीरचे व्यापारी मोहसिन अख्तर मीर यांच्याशी लग्न केले. मोहसीन उर्मिलापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या भाचीच्या लग्नात उर्मिला आणि मोहसीन यांची भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. मोहसीनने एका चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट झोया अख्तरचा ‘लक बाय चान्स’ होत’. मोहसीनने मिस्टर इंडिया स्पर्धेतही त्याने तिसरे स्थान पटकावले आहे.


लग्नानंतर उर्मिलाने 2018 मध्ये फक्त ‘ब्लॅकमेल’ हा एकच चित्रपट साइन केला. यानंतर उर्मिला चित्रपटांपासून दूर राहिली. पण तिच्या लुकबद्दल बोलायचे झाले तर ती अजूनही खूप सुंदर आणि स्टायलिश दिसते. इन्स्टावर त्याचे बरेच फॉलोअर्स आहेत जे त्याच्या स्टाईल स्टेटमेंटला फॉलो करतात.


हे ही वाचा – Coronavirus : अभिनेत्री जया बच्चन कोरोना पॉझिटिव्ह ; करण जोहरच्या सिनेमाचं शूटिंग थांबलं