प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने 90’च्या दशकात एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले आहेत. त्यावेळी चाहते, अभिनेते आणि अगदी दिग्दर्शकही तिच्या सौंदर्याचे दिवाने होते. ज्यामुळे उर्मिला तिच्या फिल्म्सपेक्षा जास्त मोहक सौंदर्यासाठी ओळखली जायची. तिचा चाहता वर्गसुद्धा प्रचंड मोठा होता. असे असताना अचानक उर्मिलाने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला आणि तिच्या फिल्मी करिअरलासुद्धा ब्रेक लागला. उद्या (4 फेब्रुवारी) उर्मिलाचा 51 वा वाढदिवस आणि यानिमित्त तिचे फिल्मी करिअर संपण्यामागचे नेमके कारण काय? याविषयी सविस्तर जाणून घेऊ. (Urmila Matondkar one mistake ruined her film career)
90’च्या दशकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
दिनांक 4 फेब्रुवारी 1974 रोजी उर्मिलाचा मुंबईत जन्म झाला. लहानपणापासून अभिनयाची आवड असणाऱ्या उर्मिलाने अभिनय विश्वातील कारकिर्दीची सुरुवात लहान वयातच केली. 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कलयुग’ या चित्रपटातून तिने बालकलाकार म्हणून काम केले होते. पुढे 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या शेखर कपूरच्या ‘मासूम’ सिनेमात ती झळकली. या सिनेमातील ‘लकडी की काठी…’ हे गाणे आजही लहान मुलांमध्ये लोकप्रिय आहे. यानंतर 1989 मध्ये तिला ‘चाणक्य’ हा सिनेमा मिळाला. हा सिनेमा मल्याळम भाषिक होता आणि यात तिने कमल हासनसोबत काम केले आहे.
View this post on Instagram
मधल्या काळात उर्मिलाने रुपेरी पडद्यासह छोट्या पडद्यावरदेखील काम केले. काही मालिकांमध्ये उर्मिलाने महत्वाच्या भूमिका साकारल्या. यानंतर 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नरसिम्हा’ सिनेमात ती झळकली. या सिनेमातून तिने बॉलिवूड डेब्यू केला. यामध्ये उर्मिलाने अभिनेता सनी देओल आणि ओम पुरी यांच्यासोबत काम केले. सिनेमाचे कथानक भले त्यांच्याभोवती फिरले असेल पण भाव खाऊन गेली ती उर्मिला. पुढे एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमांमध्ये ती झळकली. त्यामुळे 90’च्या दशकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत तिच्या नावाचा समावेश आहे.
‘रंगीला’ने दिली विशेष ओळख
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि अभिनेता आमीर खानचा ‘रंगीला’ हा सिनेमा 1995 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा उर्मिलाच्या कारकिर्दीसाठी एक टर्निंग पॉईंट ठरला. ‘रंगीला’चे दिग्दर्शन राम गोपाल वर्माने केले होते. ज्यामध्ये उर्मिला एका डान्सरच्या भूमिकेत होती. या सिनेमात तिने काही बोल्ड सीन्ससुद्धा दिले आहेत. या सिनेमातून खऱ्या अर्थाने उर्मिला प्रेक्षकांच्या मनात वसली. विशेष असे की, या सिनेमासाठी तिला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ श्रेणीत फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.
प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत अफेअर
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्यातील नात्याविषयी सगळेच जाणतात. ‘रंगीला’पासून सुरू झालेलं त्यांचं कनेक्शन चांगलंच चर्चेत राहिलं. त्यावेळी राम गोपाल वर्माच्या प्रत्येक सिनेमात उर्मिला दिसत होती आणि तेव्हापासून दोघांच्या अफेअरची चर्चा सुरु झाली. माहितीनुसार, वर्माने उर्मिलाला साइन करायचे म्हणून त्याच्या एका सिनेमातून ‘धकधक गर्ल’ अशी ख्याती असणाऱ्या माधुरी दीक्षितला चक्क काढून टाकले होते. राम गोपाल वर्मा आणि उर्मिलाने एकत्र तब्बल 13 सिनेमांसाठी काम केलं आहे. दरम्यान, दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
… अन् करिअर संपलं
एकीकडे राम गोपाल वर्मा आणि उर्मिला एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. तर दुसरीकडे उर्मिलाच्या करिअरला उतरती कळा लागण्याचे मार्ग मोकळे होऊ लागले. वर्मा आणि उर्मिलाच्या नात्याबाबत दररोज नव्या बातम्या येऊ लागल्या. दरम्यान, उर्मिलाने अनेक हिट सिनेमे दिले. तिचे चाहतेही भरपूर होते. पण असे असूनही राम गोपाल वर्मासोबत केलेलं काम आणि जोडलेलं नाव तिच्या सिनेकरिअरच्या दृष्टीने धोक्याचे ठरले. अनेक दिग्दर्शकांनी उर्मिलाला त्यांच्या सिनेमात कास्ट करण्यास स्पष्ट नकार दिला. कारण – राम गोपाल वर्मासोबत असणारे वाद.
View this post on Instagram
उर्मिलाचे सिनेसृष्टीतील करिअर जवळपास संपण्याच्या मार्गावर होते. अशातच तिचे वर्मासोबत असलेले अफेअर त्याच्या पत्नीला समजले. संतापाच्या भरात तिने उर्मिलाच्या कानशिलात लगावली आणि अशावेळी अभिनेत्री पूर्ण निराधार झाली. न करिअर झाले, ना प्रेम मिळाले. अशा अवस्थेत ती अचानक सिनेइंडस्ट्रीतून गायब झाली. काही काळ लाइमलाईटपासून पूर्ण लांब राहिल्यानंतर तिने वयाच्या 42 व्या वर्षी तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या मोहसिन अख्तर मीरसोबत लग्न केले. त्यांच्या वयातील अंतर त्यावेळी चर्चेचा विषय ठरले होते. मात्र, 8 वर्षाच्या संसारानंतर ते एकमेकांपासून वेगळे झाले.
अभिनेत्रीचा राजकारणात प्रवेश
उर्मिलाने बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीला अनेक हिट सिनेमे दिले असले तरीही 2003 नंतर मात्र तिचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरले. 2008 मध्ये ती ‘कर्झ’ सिनेमात दिसली. यात हिमेश रेशमिया, डिनो मोरिया, डॅनी डेन्झोंगपा महत्वाच्या भूमिकेत होते. मात्र, तरीही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर वाईट आपटला. यानंतर उर्मिलाचं करिअर पूर्णपणे संपुष्टात आलं. दरम्यान, तिने 2019 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकारणात एंट्री केली. या पक्षातून तिने लोकसभा निवडणूक लढवली. ज्यात तिचा पराभव झाला. पुढे 2020 मध्ये उर्मिलाने या पक्षाचा राजीनामा दिला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला.
करिअर संपलं तरीही कोट्यवधींची मालकीण
एकेकाळी बॉलिवूड सिनेइंडस्ट्री गाजवणाऱ्या उर्मिला मातोंडकरला आजकाल सिनेमांमध्ये काम मिळत नाही, हे सत्य आहे. परंतु असे असूनही अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण आहे. उर्मिला आजही अगदी रॉयल आणि लक्झरी आयुष्य जगतेय. मीडिया रिपोर्टनुसार, उर्मिलाकडे तब्बल 68 कोटी रुपयांची संपत्ती आहे. इतकंच काय तर अभिनेत्रीकडे 1 कोटी 27 लाख रुपयांचे हिऱ्यांचे दागिने, 1 लाख 48 हजार रुपयांची सोन्याची नाणी आणि महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. यात मर्सिडीजसह दोन अन्य गाड्यांचा समावेश आहे.
हेही पहा –
Grammy Awards 2025 : भारतीय संगीतकार चंद्रिका टंडनने जिंकला ग्रॅमी पुरस्कार