Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी उर्मिला मातोंडकर 10 वर्षानंतर टीव्हीवर परतणार, भाग्यश्रीसोबत दिसणार पहिली झलक

उर्मिला मातोंडकर 10 वर्षानंतर टीव्हीवर परतणार, भाग्यश्रीसोबत दिसणार पहिली झलक

Subscribe

भाग्यश्रीने म्हटलं आहे की, मी याची आतुरतेने वाट पाहत आहे. मी स्वतः एक सुपर मॉम आहे, त्यामुळे मी अजिबात जजेसची भूमिका करण्यास नाही म्हणणार नाही.

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आता 10 वर्षानंतर टीव्हीवर दिसणार आहे. एका मालिकेतून ती चाहत्यांच्या भेटीला येईल. अभिनेत्री भाग्यश्रीसोबत पहिली झलक दिसेल. रंगीला, जुदाई, अफलातून आणि सत्या अशा अनेक चित्रपटांतून वेगवेगळ्या भूमिका करुन चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी उर्मिला मातोंडकर पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. अभिनयात पुन्हा एकदा उर्मिला एन्ट्री कऱण्यासाठी उर्मिला मातोंडकर सज्ज आहे. 10 वर्षानंतर डांस रिएलिटी शो ‘डीआईडी सुपर मॉम्स’ या कार्यक्रमातून टीव्हीवर घरवापसी करणार आहे. याच रिएलिटी शोमध्ये ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्रीसुद्धा असणार आहे.

दरम्यान एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार उर्मिला मातोंडकर आणि भाग्यश्री यंदा जीटीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘डीआईडी सुपर मॉम्स’ मध्ये जजेसच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच त्यांच्यासोबत कोरियोग्राफर रेमो डिसूजासुद्धा असेल. परंतु याबाबत उर्मिला मातोंडकर यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तर भाग्यश्रीने म्हटलं आहे की, मी याची आतुरतेने वाट पाहत आहे. मी स्वतः एक सुपर मॉम आहे, त्यामुळे मी अजिबात जजेसची भूमिका करण्यास नाही म्हणणार नाही.

भाग्यश्रीकडून उर्मिलाचे कौतुक

- Advertisement -

भाग्यश्रीने उर्मिला मातोंडकरचे कौतुक केलं आहे. उर्मिला मातोंडकर चांगली डांसर असल्याचे भाग्यश्रीने म्हटलं आहे. कार्यक्रमाबाबत भाग्यश्री म्हणाली की, हे एक चांगले व्यासपीठ आहे. जे लोकांना आपले स्वप्न पूर्ण करण्याची संधी देते. तसेच त्यांना मार्ग निवडण्यासाठी एक संधी देते. तसेच उर्मिलाबाबत भाग्यश्रीने म्हटलं आहे की, उर्मिलासोबत काम करण्यास मी उत्सूक आहे. ती एक चांगली डांसर आहे.


हेही वाचा ; जॉनी डेप आणि एम्बर हर्ड खाटल्यावर अखेर पूर्णविराम, पण एलॉन मस्क यांचं ट्विट चर्चेत

- Advertisement -
- Advertisement -
Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -