‘Urvarshi Rautela’चा अरब फॅशन वीकमध्ये जलवा ; घातला 40 कोटींचा असा ड्रेस की…

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच युनिक हटके फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. उर्वशीच्या एकूणच सकारात्मक व्यक्तीमत्वमुळे फॅशनेबल ड्रेसमध्ये ती अगदी उठून दिसते. सोशल मिडियावरही ती बरीच सक्रिय असते. मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या सौंदर्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. अलीकडेच उर्वशीने अरब फॅशन वीकमध्ये भाग घेतला. यासह, अरब फॅशन वीकमध्ये दोनदा उपस्थिती लावणारी ती पहिली भारतीय ठरली आहे.

Urvashi Rautala wore a gold dress worth Rs 40 crore
'Urvarshi Rautela'चा अरब फॅशन वीकमध्ये जलवा ; घातला 40 कोटींचा असा ड्रेस की...

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच युनिक हटके फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. उर्वशीच्या एकूणच सकारात्मक व्यक्तीमत्वमुळे फॅशनेबल ड्रेसमध्ये ती अगदी उठून दिसते. सोशल मिडियावरही ती बरीच सक्रिय असते. मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या सौंदर्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. अलीकडेच उर्वशीने अरब फॅशन वीकमध्ये भाग घेतला. यासह, अरब फॅशन वीकमध्ये दोनदा उपस्थिती लावणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. पण उर्वशीच्या या फॅशन वीकपेक्षा तिच्या गाऊनची जास्त चर्चा सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.

अरब फॅशन वीकमध्ये उर्वशीने उंच थाई स्लिट गोल्डन गाऊन परिधान केला आहे. हिऱ्यांनी बनवलेल्या या गाऊनमध्ये उर्वशी राणीपेक्षा कमी दिसत नाही. डोक्यापासून पायापर्यंत दागिन्यांनी बनवलेल्या गाऊनमध्ये उर्वशीचा लूक शानदार दिसत आहे. पण सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे उर्वशीच्या या गाऊनची किंमत 40 कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. एका वृत्तानुसार उर्वशीने 40 कोटींचा क्लियोपेट्रा रियल गोल्ड आणि डायमंड आउटफिट परिधान केला असून प्रसिद्ध डिझायनरने उर्वशीचा ड्रेस तयार केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by #RAM MISHRA (@photographerrammishra)

40 कोटींच्या या सोन्याच्या गाऊनमध्ये उर्वशीने अनेकांना आपल्या सौदर्यांने घायाळ केले. तिचे हेडगियर आणि गाऊन प्रसिद्ध फॅशन डिझायनर फर्न वन अमांटो यांनी डिझाइन केले आहेत. अमांटोने बेयॉन्से आणि जेनिफर लोपेझ यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्टार्ससाठीही कपडे डिझाइन केले आहेत. अभिनेत्रीने तिच्या फोटोशूटचा व्हिडिओही शेअर केला आहे. ती लिहिते ‘आज माझे हृदय माझ्या देशाबद्दल कृतज्ञतेने आणि भावनांनी भरले आहे.’ यासह उर्वशीने @arabfashionweek आणि @amantoofficial या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय फॅशन वीकमध्ये दोनदा शोस्टॉपरचे स्थान दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.


हे ही वाचा – Coronavirus : अभिनेत्री काजोलला कोरोनाची लागण ; लेकीला मिस करत शेअर केली पोस्ट