Video : उर्वशीच्या ‘बेली डान्स’ने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

उर्वशी बेली डान्समुळे चर्चेत आली असून तिच्या मादक डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

Urvashi Rautela
उर्वशी रौतेला

बॉलिवूड अभिनेत्र उर्वशी रौतेला सोशल मीडियावर फारच अ‍ॅक्टिव्ह असते. तिचा कोणताही व्हिडिओ असो किंवा कोणताही फोटो सोशल मीडियावर चांगलाच धूमाकूळ घालतो. दरम्यान, उर्वशी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी उर्वशी बेली डान्समुळे चर्चेत आली असून तिच्या मादक डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

‘हिप्स डोन्ट लाय’ या गाण्यावर बेली डान्स

उर्वशीने जगप्रसिद्ध पॉप सिंगर शकिराच्या ‘हिप्स डोन्ट लाय’ या गाण्यावर बेली डान्स करताना दिसत आहे. तिने आपला हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. उर्वशीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत असून चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर अनेकांनी उर्वशीच्या डान्सचे कौतुक देखील केले आहे.

 

‘हिप्स डोन्ट लाय’ हे शाकिराच्या करिअरमधील सर्वाधिक गाजलेल्या गाण्यांपैकी एक असून हे गाणं २००६ साली प्रदर्शित झाले होते. या गाण्याचे बोल स्वत: शकीराने लिहिले होते.


हेही वाचा – नवाजुद्दीनच्या पत्नीने घटस्फोटात काय काय मागितलं?