Cannes Film Festival 2022: ‘कान’मध्ये उर्वशी रौतेलाच्या पहिल्या तमिळ चित्रपटाचे पोस्टर होणार लाँच

urvashi rautela to attend Cannes Film Festival 2022 for tamil movie the legend poster
Cannes Film Festival 2022: 'कान'मध्ये उर्वशी रौतेलाच्या पहिल्या तमिळ चित्रपटाचे पोस्टर लाँच

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या ग्लॅमरस लूक आणि फोटोंमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच ही अभिनेत्री एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. ही चर्चा म्हणजे अभिनेत्री तिचा पहिला तामिळ चित्रपट.
विशेष म्हणजे अभिनेत्रीने या चित्रपटाचे पोस्टर लाँचिंग यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वशी कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या 75 व्या सोहळ्यात तिचा पहिला तमिळ चित्रपट द लीजेंडचे पोस्टर लाँचसाठी उपस्थित राहणार आहे.

उर्वशी नुकतीच फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाली आहे. यादरम्यान अभिनेत्री मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. कॅमेऱ्यात कैद झालेली ही अभिनेत्री यावेळी स्लीव्हलेस सिल्व्हर बलून टॉप आणि हाय-राईज ब्लॅक फ्लेर्ड लेदर पॅंटमध्ये दिसली. यासोबतच तिने हाय हील्स आणि खुल्या केसांमध्ये खूपच सुंदर दिसत होती. कान्स महोत्सवात चित्रपटाच्या पोस्टर लाँचबद्दल बोलताना, अभिनेत्री म्हणाली, “जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या कान्स येथे माझ्या पहिल्या तमिळ चित्रपट द लिजेंडच्या पोस्टर लाँचसाठी आमंत्रित केल्याबद्दल मला खरोखरच अभिमान वाटतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by CineRiser (@cineriserofficial)

कान फिल्म फेस्टिव्हल यावर्षी 75 व्या सोहळ्याचे आयोजन करत आहे. यानिमित्ताने या चित्रपट महोत्सवाच्या इतिहासात प्रथमच भारताचा सन्मान देश म्हणून समावेश करण्यात आला आहे. यावर्षी होणाऱ्या या चित्रपट महोत्सवात अभिनेत्री दीपिका पदुकोण ज्युरी सदस्य म्हणून या महोत्सवात सहभागी होत आहे. त्याचबरोबर अभिनेत्री ऐश्वर्या राय देखील तिचा पती अभिनेता अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्यासोबत महोत्सवात सहभागी होण्यासाठी रवाना झाली आहे.

अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास, उर्वशी लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात अभिनेत्री मिशेल मॉरोन सोबत 365 दिवस दिसणार आहे. नेटफ्लिक्स आणि टॉमस मेंडेस निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन 365 डेजच्या दिग्दर्शिका बार्बरा बियालोव्हास करणार आहेत. याशिवाय उर्वशी जिओ स्टुडिओच्या इन्स्पेक्टर अविनाशमध्ये रणदीप हुड्डासोबत दिसणार आहे.


मराठी कथांसाठी पुन्हा सुरु होतयं एक व्यासपीठ ‘प्रतिबिंब’