‘दूर रहा आमच्या ऋषभपासून’, उर्वशीने पंतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने नेटीझन्स भडकले

urvashi rautela troll after she wish rishabh pant birthday memes viral
'दूर रहा आमच्या ऋषभपासून', उर्वशीने पंतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने नेटीझन्स भडकले

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमी आपल्या फिटनेसमुळे चर्चेत असते. उर्वशी आपल्या सुंदर लूक्स आणि महागड्या आउटफिट्सच्या कारणांमुळेही चर्चेत असते. सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. अलीकडेच तिने क्रिकेटर आणि आयपीएल टीम दिल्लीचा कॅपिटलचा कर्णधार ऋषभ पंतला त्याच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या होत्या. ज्यानंतर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर उर्वशी आली आहे असून लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

४ ऑक्टोबरला ऋषभ पंतने आपला २४वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने उर्वशीने ट्टीटकरून शुभेच्छा दिल्या होत्या. तिने ऋषभ पंतला टॅग करत लिहिले की, ‘हॅप्पी बर्थडे.’ या ट्वीटच्यानंतर सोशल मीडियावर युजर्सने तिला ट्रोल करण्यास सुरु केले आहे. दरम्यान काही वर्षांपूर्वी दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू होत्या. ऋषभ उर्वशीला डेट करत असल्याचे म्हटले जात होते. पण नंतर दोघे वेगळे झाले. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, ऋषभने उर्वशीला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केले होते. ऋषभ आणि उर्वशीचा भूतकाळची आठवण करून लोकांनी आता अभिनेत्रींपासून क्रिकेटरला दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

सोशल मीडियावर अनेक प्रकारे उर्वशी आणि ऋषभवर मीम्स तयार केले जात आहे. एका युजरने म्हटले आहे की, ‘दीदी, कृपया आमच्या ऋषभपासून दूर राहा.’ तर दुसऱ्याने म्हटले आहे की, ‘ऋषभचे लक्ष्य भरकवटण्याचा प्रयत्न नको करू, टी-१० जवळ येत आहे.


हेही वाचा – विक्रम भट्टच्या दुसऱ्या लग्नावर मुलीची प्रतिक्रिया; म्हणाली, ‘त्यांच्या या लग्नावर मी खुश आहे’