उर्वशी रौतेला ही बॉलिवूड सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जी सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. या माध्यमातून ती कायम काही ना काही पोस्ट शेअर करताना दिसते. तसेच विविध विषयांवर कायम व्यक्त होत असते. दरम्यान, अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात तिने प्रतिक्रिया दिली होती. ज्यावरून सोशल मीडियावर नेटिझन्सने तिला जबरदस्त ट्रोल केले होते. यावर आता अभिनेत्रीने ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिले आहे. ज्यामुळे ती पुन्हा एकदा ट्रोल होताना दिसतेय. (Urvashi Rautela trolled again after reaction on trolling)
उर्वशी रौतेलाचे ट्रोलर्सला प्रत्युत्तर
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला गेल्या काही दिवसांपासून दोन कारणांमुळे चर्चेत आहे. एक म्हणजे तिचा सिनेमा ‘डाकू महाराज’ने बॉक्स ऑफिसवर 105 करोड रुपयांचे कलेक्शन केले आहे. दूसरे कारण म्हणजे, तिने सैफ अली खान हल्लाप्रकरणावर दिलेली प्रतिक्रिया. या प्रतिक्रियेनंतर अभिनेत्री ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती. अखेर तिने ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिले आहे. ज्यात तिने म्हटले, ‘जेव्हा लोक पीएम मोदी आणि शाहरुख खान यांना सोडत नाहीत तर यामध्ये काय केलं जाऊ शकतं?’ अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना उर्वशीने तिला वाईट वाटल्याचे म्हटले आणि मध्येच आपल्या महागड्या घड्याळांविषयी सांगायला सुरुवात केली. ज्यामुळे ट्रोलर्सने तिची खिल्ली उडवली होती.
View this post on Instagram
इंस्टंट बॉलिवूडशी संवाद साधताना उर्वशीने म्हटले, ‘काय आहे ना.. आता तुम्ही परत बोलाल मी प्रश्नांची योग्य उत्तरे देऊ शकत नाही. पण आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदीजी, माझे सर्वांत प्रिय अभिनेते सुपरस्टार शाहरुख खान, सलमान खान… यांनादेखील लोक सोडत नाहीत. तर मग तुम्हीच सांगा यात काय करता येईल?’
ट्रोलर्सने पुन्हा साधला निशाणा
उर्वशीच्या या वक्तव्यावरदेखील ट्रोलर्सने टीका करण्याची संधी सोडलेली नाही. त्यामुळे अभिनेत्री पुन्हा एकदा ट्रोल होताना दिसतेय. या व्हिडिओवर कमेंट करताना एका नेटकऱ्याने लिहिलंय, ‘वाह काय उत्तर दिलंय.. ज्याला काहीच अर्थ नाही’. तर अन्य एकाने लिहिले, ‘हिने आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःचा चेहरा इतक्यावेळा पोस्टरवर पाहिला असेल’. आणखी एकाने लिहिले, ‘यावेळी डायमंड रिंग आणि रोलेक्स घड्याळ नाही दाखवलं’.
अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती एक भारतीय अभिनेत्री तसेच मॉडेल आहे. उर्वशीने मिस दिवा 2015 चे विजेतेपद पटकावल्यानंतर मिस युनिव्हर्स 2015 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. उर्वशीने ‘सिंग साहब दि ग्रेट’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केले होते. त्यानंतर ‘सनम रे’, ‘ग्रेट ग्रॅन्ड मस्ती’, ‘हेट स्टोरी 4’, ‘पागलपंती’ यांसारख्या सिनेमात ती झळकली होती. आगामी काळात तिचा ‘घुसपैठिया’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
हेही पहा –
Akshay Kumar : ‘स्काय फोर्स’ची तिसऱ्या दिवशी करोडोंची कमाई, खिलाडीचा सिनेमा हिट ठरणार?