उर्विशी रौतेलाचा ‘देसी लूक’

urvashi rautela desi look
उर्विशी रौतेलाचा देसी लूक

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आपल्या शानदार स्टाइलसाठीही ओळखली जाते. त्याचप्रमाणे तिच्या हॉट, ग्लॅमरस लुकची बिटाउनमध्ये नेहमीच चर्चा असते. बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमांमध्ये उर्वशीच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली ज्यामध्ये सनम रे, वर्जिन भानुप्रिया, हेट स्टोरी ४स आणि ग्रँड मस्ती सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. सोशल मिडियावर देखील ती फेमस सेलिब्रिटी आहे. आपले लेटेस्ट फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तिच्या सुंदर, हॉट फोटोंची सोशल मिडियावर चर्चा असते. परंतु सध्या तिच्या जरा वेगळ्या लुकमधील व्हिडिओमुळे सारे जण आश्चर्य व्यक्त करत आहे. या व्हिडिओमध्ये उर्वशीने पीच रंगाचा कुर्ता- पायजमा परिधान करत त्यावर ओढणी घेतली आहे. आणि या व्हिडिओला कॅप्शन देत लिहिले आहे, मी माझ्या खऱ्या स्किन टोनपेक्षा जास्त डार्क वाटतेयं, अधिक मजेदार काहीतरी लवकरचं येणार आहे. हाय.. माझे मोठे केस.. कोणाची नजर ना लागो. व्हिडिओमध्ये उर्वशीच्या मोठ्या केसांसह डोक्यांमध्ये सिंदूर भरले आहे. यावरुन अंदाज लावला जात आहे की उर्वशी तिच्या आगामी चित्रपटात विवाहित महिलेची भूमिका निभावणार आहे. या व्हिडिओमध्ये ती चालत जात कॅमेऱ्याकडे बघत वेगवेगळ्या पोज देत आहे.