ऋषभला पाहण्यासाठी उर्वशी पोहोचली मुंबईत; हॉस्पिटलबाहेरचा फोटो केला शेअर

टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत याच्या गाडीला 30 डिसेंबरच्या पहाटे मोठा अपघात झाला. रुरकी येथे ऋषभ पंतची कार दुभाजकाला धडकली. या अपघातात पंतच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाली आहे. अपघातानंतर कारने पेट घेतला आणि कार पूर्णपणे भस्मसात झाली. कारची काच फोडून पंत यांना बाहेर काढले आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले. या कार अपघातानंतर ऋषभ पंतवर डेहराडूमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आता पुढील उपचारांसाठी ऋषभला मुंबईत आणण्यात आले आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (डीडीसीए) मोठा निर्णय घेतला आहे. डीडीसीए पंतला उपचारासाठी मुंबईला आणण्यात आले असून, येथे त्याच्या लिगामेंटच्या दुखापतीवर उपचार केले जाणार आहेत.

दरम्यान, अशातच आता अभिनेत्री आणि मॉडेल उर्वशी रौतेला देखील मुंबईमध्ये पोहोचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ सध्या मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून याचं हॉस्पिटलच्या आसपासच्या परिसरात उर्वशी असल्याचं म्हटलं जात आहे. याबाबत उर्वशीने स्वतः इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली होती.

urvashi rautela instagram

ज्यात कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचा फोटो दिसत आहे. त्यामुळे उर्वशी नक्कीच ऋषभला भेटण्यासाठी गेली असेल का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. शिवाय अपघाताची बातमी कळल्यानंतर देखील उर्वशी “प्रार्थना” अशी एक पोस्ट शेअर केली होती. तेव्हा देखील चर्चांना उधाण आलं होतं.

कसा झाला ऋषभचा अपघात
दिल्लीहून उत्तराखंडमधील आपल्या घरी ऋषभ पंत परतत असताना पहाटे साडेपाचच्या सुमारास रुरकीच्या नारसन सीमेवर हम्मदपूरजवळ हा अपघात झाला. पंत याची मर्सिडीज गाडी सुसाट वेगात होती आणि दुभाजकाला आदळल्यानंतर रेलिंग तोडून गाडी पलीकडे गेली. वेग जास्त असल्याने सुमारे 200 मीटरवर जाऊन ही कार थांबली. त्यानंतर तिला आग लागली. ऋषभ पंत ज्या कारमधून घरी परतत होता, त्या गाडीचा नंबर प्लेट आहे.

 


हेही वाचा : 

AR Rahman Birthday: ‘ही’ आहेत ए.आर.रेहमानची 5 सुपरहिट गाणी