Saturday, April 10, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन काढा पिऊन झालो बरा.. कोरोना पॉझिटिव्ह मिलिंद सोमन

काढा पिऊन झालो बरा.. कोरोना पॉझिटिव्ह मिलिंद सोमन

मिलिंद सोमनने एक नवी पोस्ट शेअर करत कोरोनावर कशाप्रकारे मात केली हे सांगताना एका काढ्याची रेसिपी देखील दिली आहे.

Related Story

- Advertisement -

संपूर्ण जगभरात कोरोना वाढत्या कोरोनासंक्रमणामुळे रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. बॉलिवूडदेखील याच्या विळख्यात अडकत चालले आहे. ज्यात अक्षय कुमार, विकी कौशल ,कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर, रणबीर कपूर, आलिया भट्ट हे कलाकार देखील आहेत. नुकतच मिलिंद सोमन याने त्याला कोरोना झाल्याची माहिती त्याच्या सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना दिली होती. यानंतर त्याने एक नवी पोस्ट शेअर करत कोरोनावर कशाप्रकारे मात केली हे सांगताना एका काढ्याची रेसिपी देखील दिली आहे. या पोस्टमध्ये मिलिंद म्हणाला की, ”क्वारंटाइनच्या काळात मी कोणता काढा घेतला मला अनेकांनी विचारले. त्यामुळे मी ही रेसिपी येथे सांगत आहे. मी कोथिंबीर, मेथीचे दाणे, काळी मिरी, तुळस, आलं आणि गूळ यांचा काढा घेतला होता. पहिल्या आठवड्यात मला कोणत्याही गोष्टीचा वास येत नव्हता. या व्यतिरिक्त मला कोणतीही लक्षणे जाणवली नाहीत.” अशी पोस्ट शेअर करत डॉक्टरांचा सल्ला घेवून त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकण्यास तो म्हणाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

 यानंतर मिलिंदने पत्नी अंकिता सोबतचा एक फोटो शेअर केला होता. ”माझा रिपोर्ट आता निगेटिव्ह आला असल्याने माझा क्वारंटाइनचा कालावधी संपला आहे. मी लवकरतात लवकर बरा व्हावा यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना केल्या होत्या, तुमचे आभार मानतो. अंकिता तू माझी चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर लगेचच गुवाहाटीवरुन आलीस आणि माझी काळजी घेतली, त्यासाठी तुझे आभार. असे म्हणत कोरोनाकाळात साथ दिल्याबद्दल पत्नीचे आभार मानले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

- Advertisement -

 असे म्हणत कोरोनाकाळात साथ दिल्याबद्दल पत्नीचे आभार मानले आहेत. सोबतच त्याने डॉक्टरांचेही आभार मानले आहे.


हे वाचा- परिपूर्ण सौंदर्याने नटलेले ‘वेल डन बेबी’चे नवीन गाणं प्रदर्शित

- Advertisement -