HomeमनोरंजनUsha Nadkarni : उषा नाडकर्णी झळकणार सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये

Usha Nadkarni : उषा नाडकर्णी झळकणार सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये

Subscribe

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन नेहमीच आपल्या प्रेक्षकांसाठी मनोेरंजनाची मेजवानी घेऊन येणारं टेलिव्हिजन प्लॅटफॉर्म आहे. आता याच सोनी एन्टरटेन्मेंटवर 27 जानेवारीपासून या वर्षाची खाद्य दंगल बघण्यासाठी सज्ज व्हा, कारण सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे, एक चविष्ट रियालिटी शो ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ – सबकी सीटी बजेगी”. हा सीझन दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता प्रसारित होणार आहे. या शोमध्ये आपल्या आवडत्या सेलिब्रिटीजचे पाककौशल्य पाहण्याची संधी मिळणार आहे. यंदाच्या शोमध्ये सामील असलेल्या सेलिब्रिटीज आहेत- उषा नाडकर्णी, गौरव खन्ना, दीपिका कक्कड, तेजस्वी प्रकाश, चंदन प्रभाकर, अर्चना गौतम, निक्की तांबोळी, राजीव अदातिया, अभिजीत सावंत, फैजल शेख आणि कविता सिंह आपले ग्लॅमरस जीवन सोडून अॅप्रन आणि शेफची हॅट घालून सेलिब्रिटी मास्टर शेफ हा किताब जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत.
होस्ट फराह खान आणि सेलिब्रिटी शेफ परीक्षक रणवीर ब्रार आणि विकास खन्ना स्पर्धकांना त्यांच्या आव्हानात मार्गदर्शन करतील. स्पर्धेत सुरक्षित राहण्यासाठी स्पर्धकांत चढाओढ सुरू झाली असून वातावरण तापले आहे. यामध्ये अर्चना आणि उषा यांची जोडी विनोदाची भर घालेल. त्या दोघी मिळून विनोदाचा तडका नक्की देतील!
मनमोकळ्या संभाषणात उषा नाडकर्णींनी कबूल केले की, “आजच्या जमान्याचे पदार्थ बनवता येत नाहीत! पण माझा अनुभव आणि माझी आवड मला या आव्हानांना तोंड देताना मदत करेल. आणि मी कितीही वर्षांची असले तरी काय झाले- शिकण्यासाठी वयाची आडकाठी नसतेच.”
दरम्यान, अर्चना गौतमच्या सतत हसण्यामुळे उषा ताई वैतागल्या. अर्चना त्यांना गंमतीत ‘सास’ म्हणत होती आणि मास्टरशेफच्या किचनमध्ये त्यांचे मजेशीर ‘तू तू मैं मैं’ चालू होते!

मास्टरशेफचा प्रतिष्ठित किताब कोण जिंकणार? बघा, सेलिब्रिटी मास्टरशेफ, सुरू होत आहे 27 जानेवारीपासून आणि दर सोमवार ते शुक्रवार प्रसारित करण्यात येईल सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

हेही वाचा : Religious Tips : मोबाइलवर हे वॉलपेपर लावणे ठरू शकते अशुभ


Edited By – Tanvi Gundaye