HomeमनोरंजनVaastav 2 : संजू बाबाच्या वास्तवचा सिक्वल येणार, मेकर्सची तयारी सुरु

Vaastav 2 : संजू बाबाच्या वास्तवचा सिक्वल येणार, मेकर्सची तयारी सुरु

Subscribe

महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वास्तव' हा सिनेमा 1999 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याकाळी हा एक जबरदस्त ऍक्शन सिनेमा म्हणून प्रेक्षकांनी उचलून घेतला होता. तगडे कलाकार, जबरदस्त ऍक्शन सीन्स आणि दर्जेदार डायलॉग्समुळे या सिनेमाने कलाकृतींचा दर्जा एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला होता. या सिनेमाचे डायलॉग्स एकदम रॉ आणि रिअल फिलिंग देणारे होते. त्यामुळे सिनेमा खऱ्या अर्थाने प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. यानंतर आता मेकर्सकडून 'वास्तव'चा सिक्वल बनवण्याची तयारी सुरु झाल्याचे समजत आहे.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने आजवर अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्याने साकारलेल्या कित्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडून गेल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे रघुनाथ नामदेव शिवलकर. म्हणजेच ‘रघु दादा’. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वास्तव’ या सिनेमातील हे मध्यवर्ती पात्र आहे. हा सिनेमा 1999 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला होता. ‘वास्तव’ या सिनेमाने अभिनेता संजय दत्तच्या कारकिर्दीला टर्निंग पॉईंट दिला होता. या सिनेमामुळे संजय दत्तला पहिला वहिला बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड मिळाला होता. आजही प्रेक्षकांना रघु दादाचे डायलॉग अगदी तोंडपाठ आहेत. बोले तोह, ’50 तोला..’. या सुपरहिट सिनेमाचा लवकरच सिक्वल येणार आहे. जो निश्चितच पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल, अशी आशा आहे. (vaastav 2 is the sequel of sanjay dutt movie coming very soon)

‘वास्तव’चा सिक्वल येणार

त्याकाळी ‘वास्तव’ हा एक जबरदस्त ऍक्शन सिनेमा म्हणून प्रेक्षकांनी उचलून घेतला होता. तगडे कलाकार, जबरदस्त ऍक्शन सीन्स आणि दर्जेदार डायलॉग्समुळे या सिनेमाने कलाकृतींचा दर्जा एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला होता. या सिनेमाचे डायलॉग्स एकदम रॉ आणि रिअल फिलिंग देणारे होते. त्यामुळे सिनेमा खऱ्या अर्थाने प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. यानंतर आता मेकर्सकडून ‘वास्तव’चा सिक्वल बनवण्याची तयारी सुरु झाल्याचे समजत आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, मेकर्सने आपली सूत्र हलवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच ‘वास्तव 2’ आपल्या भेटीला येणार, हे नक्की!

इंडियन सिनेमाचा OG म्हणजे ‘वास्तव’

‘वास्तव’ हा सिनेमा इंडियन सिनेमाचा OG म्हणजेच ओरिजनल गँगस्टर ड्रामा मानला जातो. त्यामुळे आता पुन्हा एकदा असाच ओजी ड्रामा पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, या सीक्वलचा आणि ओरिजनल सिनेमाच्या गोष्टीचा काहीही संबंध नाही. मात्र, यावेळी महेश मांजरेकर जी गोष्ट घेऊन येणार आहेत ती प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे. एक वेगळा आणि वास्तववादी सिनेमा बनवण्याची ते जोरदार तयारी करत आहेत. वास्तव या टायटलला शोभेल अशी गोष्ट आणि तितकीच दमदार कलाकारांची फौज घेऊन ते पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस गाजवणार आहेत.

पुन्हा रघु दादा साकारण्यासाठी संजुबाबा तयार

रिपोर्टनुसार, अभिनेता संजय दत्त आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सिक्वलच्या कथानकाबाबत बरीच चर्चा केली आहे. यासाठी त्यांनी नवनवीन प्लॅन आखले आहेत. वास्तवच्या सिक्वेलची कथा ऐकल्यानंतर संजय दत्त आता रघु दादाला पुन्हा साकारण्यासाठी सज्ज होत आहे. असंही म्हटलं जातंय की, 2025 च्या अखेरीस या सिनेमाच्या शूटिंगची सुरुवात होईल आणि आगामी वर्षात रिलीजचा विचार केला जात आहे. तूर्तास ‘वास्तव 2’ बाबतची पूर्ण माहिती गुलदस्त्यात आहे.

मुळात ‘वास्तव’ या सिनेमाबाबत नुसता विचार केला तरी सगळ्यात आधी डोक्यात येतो तो गॅंगवॉर. पण यावेळी खोका, पेटी, घोड़ा या शब्दांच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळं असं देण्याचा मानस मेकर्सचा आहे. त्यामुळे ‘वास्तव 2’ हा सिनेमा एक नवा विक्रम रचणार, असे दिसत आहे.

हेही पहा –

Elvish Yadav : युट्युबर एल्विश यादववर कोर्टाकडून FIR दाखल करण्याचे आदेश जारी