घरताज्या घडामोडीप्रेक्षकांना Valentine स्पेशल गिफ्ट ! Radhe Shyam चं नवं पोस्टर रिलीज

प्रेक्षकांना Valentine स्पेशल गिफ्ट ! Radhe Shyam चं नवं पोस्टर रिलीज

Subscribe

मूळ तमिळ भाषेत असलेला राधेश्याम हा सिनेमा कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत पाहायला मिळणार आहे.

Radhe Shyam :  बाहुबली प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या बहुप्रतिक्षीत राधे श्याम सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. सिनेमा ११ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला होता. प्रभास आणि पूजाची लव्ह स्टोरी सिनेमात पाहायला मिळणार आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्त राधेश्यामने प्रेक्षकांना खास सप्राइज देत सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज केले आहे. ज्यात प्रभास आणि पूजा एक वेगळ्या अंदाजात दिसत आहेत.

प्रभासने त्याच्या सोशल मीडियावरुन सिनेमाचं व्हॅलेंटाईन स्पेशल पोस्टर शेअर केले आहे. ज्यात पूजा हेगडे हातात गुलाल घेऊन होळी खेळताना दिसत आहे. तर प्रभास पिंक करलचा शर्ट घालून पाठमोरा काही तरी विचार करताना दिसत आहे. पोस्टरच्या बॅकग्राऊंडला पिंक फूलांचे पेंटिग्ज दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

- Advertisement -

‘माझ्याकडे सर्वांसाठी एका खास दिवसाठी काहीतरी खास आहे’, असे म्हणत प्रभासने सिनेमाचं नवं पोस्टर शेअर केले आहे. प्रभासच्या पोस्टवरुन असे समजते आहे की, १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे निमित्त सिनेमाविषयी काहीतरी खास घोषणा होणार आहे. सिनेमाचं नवं पोस्टर हे चार वेगवेगळ्या भाषांमध्ये तयार करण्यात आले आहे.

- Advertisement -

प्रभास आणि पूजाचा राधेश्याम हा सिनेमा १४ जानेवारीला मकर संक्रातीच्या मुहूर्तावर रिलीज होणार होता मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आली. आता अखेर राधेश्याम ११ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मूळ तमिळ भाषेत असलेला राधेश्याम हा सिनेमा कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत पाहायला मिळणार आहे.


हेही वाचा – कंगना रनौतला नाही आवडला दीपिका पदुकोणचा ‘Gehraiyaan’ चित्रपट, म्हणाली…

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -