झी मराठी ने ह्या होळीनिमित्ताने प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा खास बेत रचला आहे. यात परंपरेनुसार होळी साजरी होणार, यात पालखी नाचवली जाणार तसेच रंगपंचमी सुद्धा साजरी होणार आहे. अभिराम, सूर्या, आदित्य, आशु आणि सिद्धू एकत्र येऊन पालखी नाचवणार आहेत. मालिकांच्या या महासंग्रामात असे प्रसंग निर्माण होणार आहेत जिथे नायिका आणि खलनायिकांचा सामना होणार आहे. ही होळी आणि धुळवड नायिकांसाठी साधी नसणारे, कारण त्यांना खलनायिकांनी आणलेल्या अनेक आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे. एकीकडे हे सर्व सुरु असताना तुम्हाला या कलाकारांची धमाला मज्जा, मस्ती, आणि काही सरप्राईज ने भरलेले डान्स परफॉर्मन्स ही अनुभवता येणार आहेत. हिंदवी पाटील खास पाहुणी म्हणून कार्यक्रमात सहभागी झाली. तिनी खास लावणी सादर केली. सर्वांची लाडकी लीला म्हणजेच ‘वल्लरी विराज’ ने होळी महासंगम बद्दल बोलताना सांगितले “तुम्हा सर्वाना आम्हाला एकत्र पाहून मज्जा येणार आहे. आम्ही सर्व नायिकांनी कमरेला ढोल बांधून वाजवले, ते ढोल जड होते आणि आम्हाला इतका ढोल वाजवायचा अनुभव नाहीये. पण एक नवीन गोष्ट शिकण्याचा आनंद होता. तर दुसरीकडे सर्व मुलांनी पालखी नाचवली आहे.
आम्ही मुलींनी तेव्हा जोशात ढोल वाजवले. पण नंतर आम्हाला बॉडीपेन व्हायला लागलं. मालिकांमध्ये काम करण्याचा एक फायदा म्हणजे तुम्हाला सर्व सण दोनदा साजरे करायला मिळतात. ‘महामालिकांच्या महासंगम’ मध्ये अनेक सर्प्राइजेस आहेत त्यात एक म्हणजे सर्व जोडप्याचे डांस तुम्हाला बघायला मिळणार आहेत. या सोबत आणखीन काही सर्प्राइजेस आहेत. होळीचा सण म्हंटल तर पुरणपोळी आणि थंडाई बिना पूर्ण होऊ शकत नाही.
हेही वाचा : Sachin khedekar : 21 वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर दिसणार चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकर
Edited By : Prachi Manjrekar