घरमनोरंजनवरुण आणि सारा एकत्र दिसणार 'या' रिमेकमध्ये

वरुण आणि सारा एकत्र दिसणार ‘या’ रिमेकमध्ये

Subscribe

'कुली नंबर १' या चित्रपटाच्या रिमेकबद्दल सर्वत्र चर्चा होत आहे. तसेच या चित्रपटासाठी वरुण आणि सारा ही जोडी झळकणार असल्याचेही समोर येत आहे.

चित्रपट सृष्टीत एक नवा रिमेक प्रक्षेकांच्या भेटीस येणार आहे. बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता वरूण धवन सध्या त्याच्या ‘कलंग’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तसेच तो ‘स्ट्रीट डान्सर’ याच्या शूटिंगमध्ये सुद्धा व्यग्र आहे. तर नुकतीच ‘सिम्बा’ आणि ‘केदारनाथ’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आलेली. तसेच कमीवेळात लोकप्रिय झालेली अभिनेत्री सारा अली खान ही सध्या कार्तिक आर्यन याच्या सोबत ‘लव आज कल २’ या चित्रपटच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यासर्वात एक चर्चा समोर येत आहे की, ९० च्या दशकातील सुपरहिट चित्रपट ‘कुली नंबर १’चा रिमेक येत आहे, तर या रिमेकमध्ये वरुण आणि सारा एकत्र दिसणार आहेत.

नंबर १ ची डेविड यांची सिरीज

‘कुली नंबर १’ या चित्रपटाच्या रिमेकबद्दल दिग्दर्शक डेविड धवन यांनी सांगितले की, हा चित्रपट बनवण्याचा विचार करत आहोत. तसेच या चित्रपटासाठी वरुण धवन आणि सारा अली खान यांच्यावर शिक्कामोर्तब केला आहे. सन १९९५ मध्ये डेविड धवन यांनी ‘कुली नंबर १’ हा चित्रपट गोविंदा आणि करिश्मा कपूर ही प्रमुख जोडी होती. या चित्रपटानंतर नंबर १ सिरीजला सुरूवात झाली. ‘हीरो नंबर १’, ‘बीबी नंबर १’ आणि ‘जोडी नंबर १’ हे चित्रपट आले होते.

- Advertisement -

या नावांची चर्चासूरू

यापूर्वी वरुण धवनने सन १९९७ मध्ये आलेल्या ‘जुडवा’ या चित्रपटाचा रिमेक ‘जुडवा २’ मध्ये दिसला होता. दिग्दर्शक डेविड धवन यांच्या ‘मैं तेरा हिरो’ या चित्रपटामध्येही तो झळकला होता. तर सध्या तो त्याच्या ‘कलंक’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तसेच आता ‘कुली नंबर १’ च्या रिमेकसाठी वरूण आणि साराची जोडी चर्चेत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -