Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांचा 'बवाल' चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित

वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांचा ‘बवाल’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Subscribe

वरुण धवन आणि जान्हवी कपूर अभिनीत ‘बवाल’या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्कंठा वाढत आहे. ‘छिछोरे’ (बेस्ट हिंदी फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट) सिनेमाच्या यशानंतर साजिद नाडियाडवाला आणि नितेश तिवारी या चित्रपट निर्मात्यांचा हा आगामी प्रोजेक्ट आहे. अशातच, ‘बवाल’या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढत असतानाच, निर्मात्यांनी अखेरीस या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट 6 ऑक्टोबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

चित्रपट पुरस्कार विजेती निर्माता-दिग्दर्शक जोडी या सिनेमासाठी एकत्र आली आहे. तसेच, यामध्ये वरुण आणि जान्हवी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत. अशातच, 6 ऑक्टोबर 2023 रोजी ‘बवाल’हा चित्रपट दर्शकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. नाडियाडवाला ग्रॅंडसनच्या बॅनरखाली साजिद नाडियाडवाला यांनी ‘बवाल’ची निर्मिती केली असून, अर्थस्काय पिक्चर्सने याची सह-निर्मिती केली आहे.


- Advertisement -

हेही वाचा :

‘पठाण’ OTT वर येताच प्राइम व्हिडिओचा सर्व्हर झाला क्रॅश

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -