Jugjugg Jeeyo चा धमाकेदार Trailer रिलीज; कियारापेक्षा अनिल कपूरसोबत जमलीय वरूण धवनची जोडी

varun dhawan and kiara advani starrer jugjugg jeeyo trailer launch event viral video
Jugjugg Jeeyo चा धमाकेदार Trailer रिलीज; कियारापेक्षा अनिल कपूरसोबत जमलीय वरूण धवनची जोडी

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता वरुण धवन सध्या त्यांच्या आगामी ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. कौटुंबिक नात्यावर भाष्य करणारा हा सिनेमा विनोदी असणार आहे, ट्रेलरवरून याचा अंदाज येतो.

दोन मिनिटे 56 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये एका कुटुंबाचे अनेक रंग पहायला मिळत आहेत. विवाहित जोडप्यांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा राज मेहता यांनी सांभाळली आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना तगडी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे. ‘जुग जुग जिओ’ हा सिनेमा 24 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. कियारा आणि वरुण व्यतिरिक्त या चित्रपटात अनिल कपूर, नीतू कपूर, मनीष पॉल, प्रसिद्ध यूट्यूबर प्राजक्ता कोळी हे कलाकार दिसणार आहेत.


नीतू कपूर आणि अनिल कपूर या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. सिनेमात असणार्‍या तगड्या स्टारकास्टमुळे प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळे प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. हा सिनेमा 24 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमातील कलाकारांनी आता सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे.


बच्चन कुटुंबीयांच्या आयुष्यातील ‘या’ जवळच्या व्यक्तीचा जगाला निरोप; अभिषेकने शेअर केली भावनिक पोस्ट