घरमनोरंजनवरुण नताशा लग्नस्थळी रवाना, अलिबागच्या समुद्र किनारी रंगणार शाही विवाह सोहळा

वरुण नताशा लग्नस्थळी रवाना, अलिबागच्या समुद्र किनारी रंगणार शाही विवाह सोहळा

Subscribe

लग्नाच्या आधीच नताशाच्या लग्नातील लेहेंग्याची चर्चा रंगली आहे. वरुणच्या लग्नाची इव्हेंट टीम काल नताशाच्या घरी पोहचली.तेव्हा नताशाच्या लग्नातील लेहग्याचा पहिला लुक समोर आला आहे.

अभिनेता वरुण धवल आणि नताशा दलाल यांच्या लग्नाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा रंगली होती. मात्र तो दिवस आता आलेला आहे. त्यांच्या लग्नाची तयारी आता सुरु झाली आहे. आज वरुणची फॅमिली अलिबागला लग्नाच्या तयारीसाठी रवाना झाली आहे. मात्र लग्नाच्या आधीच नताशाच्या लग्नातील लेहेंग्याची चर्चा रंगली आहे. वरुणच्या लग्नाची इव्हेंट टीम काल नताशाच्या घरी पोहचली.तेव्हा नताशाच्या लग्नातील लेहग्याचा पहिला लुक समोर आला आहे. तिने लेहेंग्यासाठी एक खास शेड निवडल्याचे दिसत आहे. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लेहेंग्यावर जबरदस्त डायमंड वर्क केलेले दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

- Advertisement -

वरुण आणि नताशाच्या लग्नासाठी त्याची फॅमिली अलिबागला रवाना झाली आहे. त्याचेही फोटो पहायला मिळत आहेत. अलिबागच्या द मेन्शनमध्ये दोघांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर वरुण आणि नताशाचा विवाह सोहळा होणार आहे. अलिबागमध्ये अनेक मोठे व्हिला दोघांच्या लग्नासाठी बुक करण्यात आले आहेत. २४ जानेवारीपर्यंत वरुण आणि नताशाच्या लग्न विधी अलिबागमध्ये होणार आहेत.

गेली अनेक दिवस दोघांच्या लव्ह स्टोरीची चर्चा रंगली होती. मात्र आता त्यांच्या लग्नावर शिक्का मोर्तब झाला आहे. वरुण आणि नताशाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. संगीत, हळद, मेहंदी, लग्न, रिसेप्शन असे साग्रसंगीत कार्यक्रम अलिबागमध्ये पार पडणार आहेत. बॉलिवूडचे अनेर स्टॉर्स वरुण आणि नताशाच्या लग्न सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. यात करण जोहर, मनीष मल्होत्रा, अर्जुन कपूर, मलायका अरोरा हे कलाकार उपस्थित राहणार आहेत.त्याचप्रमाणे नीतू कपूर, जाव्हवी कपूर,कियारा अडवाणी, कतरिना कैफ, अनिल कपूर, सलमान खान,डेविड धवन हे वरुण आणि नताशाच्या लग्नाला हजेरी लावणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – प्रिया बापट झळकणार आंतरराष्ट्रीय चित्रपटात

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -