Varun Dhawan करतोय ‘या’ साऊथ फिल्मच्या हिंदी रिमेकची तयारी

varun dhawan atlee south film theri hindi remake shah rukh khan
Varun Dhawan करतोय या साऊथ फिल्मच्या हिंदी रिमेकची तयारी

सध्या बॉलिवूडमध्ये साऊथ इंडियन फिल्मच्या हिंदी रिमेकचा ट्रेन्ड सुरु आहे. ‘कबीर सिंग’पासून ते अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’पर्यंत अनेक बॉलिवूड चित्रपट हे साऊथ चित्रपटांचे हिंदी रिमेक आहेत. आता या यादीत आणखी एका नावाची भर पडणार आहे. कारण अभिनेता वरुण धवन साऊथ फिल्मच्या हिंदी रिमेकची तयारी करत आहे. यासाठी वरूणने साऊथचा प्रसिद्ध डायरेक्टर ऍटलीसोबत बोलणी सुरु केली आहेत.

वरुण आणि ऍटली एका थ्रिलर चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. ऍटली वरुण धवनसोबत त्यांचा साऊथ चित्रपट थेरीचा हिंदी रिमेक बनवणार आहेत. ऍटली यांनी हा चित्रपट २०१६ मध्ये बनवला होता. यात साऊथचा सुपरस्टार विजय दवरकोंडा आणि समंथा रुथ प्रभू यांनी काम केले होते. याच्या हिंदी रिमेकबाबात कोणताही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र सध्या ऍटली यांच्या चित्रपटाच्या हिंदी रिमेकबाबत बॉलिवूडमध्ये विशेष चर्चा आहे. ऍटली यांच्या आवडीच्या कलाकारांच्या शर्यतीत वरूण धवन आघाडीवर आहे. नुकतीच दोघांनी एकमेकांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये साऊथ चित्रपटाच्या हिंदी रिमेक करण्यावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

‘थेरी’या मुळ साऊथ चित्रपटात अभिनेता विजय याने डीसीपी विजय कुमार, जोसेफ कुरुविला आणि धर्मेश्वर अशा तीन वेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. तर यात समंथा त्याच्या पत्नीच्य़ा भूमिकेत दिसली. या चित्रपटाची कथा एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्या जीवनाभोवती फिरणारी आहे. ज्यात त्याच्या कुटुंबाची एका राजकारण्याकडून निर्दयपणे हत्या होते.

‘थेरी’च्या रिमेकमध्ये वरुण धवन काम करत असल्याची बातमी अनेक वर्षांपूर्वी आली होती. आता त्यांच्या दोघांच्या भेटीनंतर चित्रपटावरील काम यशस्वी होताना दिसत आहेत. सध्या ऍटली शाहरुख खानसोबत नवीन चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटाला ‘लायन’ असे नाव देण्यात आले आहे. साऊथ अभिनेत्री नयनतारा या चित्रपटात शाहरुख खानसोबत झळकणार आहे.


‘तोरबाज’ दिग्दर्शक गिरीश मलिकवर कोसळला दु:खाचा डोंगर; 17 वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू