HomeमनोरंजनVarun Dhawan Daughter Photo : वरूण धवनने शेअर केला लेकीचा फोटो

Varun Dhawan Daughter Photo : वरूण धवनने शेअर केला लेकीचा फोटो

Subscribe

नुकताच जगभरात ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. याचनिमित्ताने बॉलिवूड सेलिब्रिटींनी ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. बॉलिवूड अभिनेता वरूण धवनने पहिल्यांदाच आपल्या लाडक्या लेकीचा चेहरा दाखवला आहे. या वर्षी वरूण आणि त्याची पत्नी अर्थात नताशा दलाल आई- बाबा झाले आहेत. त्यांनी त्यांच्या लाडक्या कन्येचं नाव लारा असे ठेवले आहे.

आजपर्यत वरूण आणि नताशाने लेकीचा फोटो शेअर केला नव्हता. ख्रिसमसच्या निमित्ताने पहिल्यांदाच त्यांनी लारासोबतचा फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी सुंदर कॅप्शनही दिले आहे. ‘मी विथ माय बेबीज. मेरी ख्रिसमस’ असं कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

- Advertisement -

वरूण धवनने शेअर केलेल्या ख्रिसमस फोटोंमध्ये तो आणि त्याची पत्नी नताशा दलाल पोज देताना दिसत आहे. नताशाने लाराला जवळ घेतलं आहे, वरूण त्याच्या पाळीव कुत्र्याला घेऊन बसला आहे. लाराला चेक्सचा फ्रॉक घालण्यात आला आहे, पण, तिचा चेहरा मात्र दाखवण्यात आला नाही. तिच्या चेहऱ्यावर हार्ट इमोजी लावण्यात आले आहे. वरूणने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्स येत आहेत. वरूणच्या या फॅमिलीसोबतच्या फोटोंची सोशल मिडीयावर चर्चा सुरू आहे.

 

- Advertisement -

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -