घरमनोरंजनCoronavirus: वरूण धवनचा पुन्हा पुढाकार; मेडिकल स्टाफसाठी केली जेवणाची व्यवस्था

Coronavirus: वरूण धवनचा पुन्हा पुढाकार; मेडिकल स्टाफसाठी केली जेवणाची व्यवस्था

Subscribe

कोरोना व्हायरसच्या लढाईत ५५ लाख रूपयांचे आर्थिक योगदान दिल्यानंतर हॉस्पिटल्समध्ये काम करणाऱ्या स्टाफच्या जेवणाची अभिनेता वरूण धवन करणार व्यवस्था..

कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीत विविध क्षेत्रातील महान व्यक्ती सहकार्य करण्यासाठी पुढे सरसावत आहेत. हे सहकार्य करताना कोणी आर्थिक स्वरूपात मदत करत आहे तर कोणी अन्न-धान्यांचे वाटप करत आहे. यामध्ये बॉलिवूड क्षेत्रातील मंडळीदेखील पुढाकार घेतला आहे. अभिनेता वरूण धवनने कोरोना व्हायरसच्या लढाईत ५५ लाख रूपयांचे आर्थिक योगदान दिल्यानंतर आता हॉस्पिटल्समध्ये काम करणारा स्टाफ जसे की, डॉक्टर्स, नर्स आणि इतर कर्मचारी यांच्याही जेवणाची तो व्यवस्था करणार आहे. यासंदर्भातील नुकतीच त्याने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

- Advertisement -

वरूण धवनने एका ऑफिशियल लेटरच्या माध्यमातून असे जाहीर केले की, ‘सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्वांचेच जगणे कठीण झाले आहे. लॉकडाऊनमुळे काही लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. जे लोक सध्या बेघर आहेत किंवा ज्यांच्याकडे लॉकडाऊनमुळे काम नसल्याने त्यांची उपासमार होत आहे अशा सर्वांनाच मी जेवणाची मदत करणार आहे.’

ताज पब्लिक सर्विस वेलफेयर ट्रस्टच्या माध्यमातून मदत

तसेच तो पुढे असे ही म्हणाला की, ‘कोरोना व्हायरसविरूद्ध असणाऱ्या लढाईत अनेक लोकं आपला जीव धोक्यात घालून काम करत ते खरंच कौतुकास पात्र आहे. मी डॉक्टरांसह इतर वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचे ठरवले आहे. कदाचित हे एक छोटं पाऊल असू शकते परंतु संकटाच्या वेळी केलेली ही मदत महत्वाची असेल. या संकटाच्या वेळी मी माझ्याकडून जे शक्य होईल ते नक्की करेन.’ वरूण हे सर्व कार्य ताज पब्लिक सर्विस वेलफेयर ट्रस्टच्या माध्यमातून करणार आहे.


लॉकडाऊनमध्ये ‘चेन्नई एक्स्प्रेस’ची चर्चा; किंगखानचा प्रसिद्ध डायलॉग होतोय व्हायरल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -