Bhediya First Look: वरुण धवनच्या ‘भेडिया’चा धडकी भरवणारा फर्स्ट लुक पाहिलात का?

'कलंक' आणि 'दिलवाले' या सिनेमानंतर वरुण धवन आणि कृती सेनन पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार

Varun dhawan kriti sanon starer Bhediya movie first look launch
Bhediya First Look: वरुण धवनच्या 'भेडिया'चा धडकी भरवणारा फर्स्ट लुक पाहिलात का?

अभिनेता ‘वरुण धवन’ आणि अभिनेत्री ‘कृती सेसन’ अभिनीत ‘भेडिया’ या बहुप्रतिक्षीत सिनेमाचा फर्स्ट लुक नुकताच भेटीस आला आहे. सिनेमात वरुण धवन एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. हा सिनेमा २५ नोव्हेंबर २०२२ ला प्रेक्षकांना पाहता येणार आहे. जवळपास १ वर्षांपासून प्रेक्षक सिनेमाची वाट पाहत होते. सिनेमातील वरुण धवनचे पहिले मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले असून धडकी भरवणारा धवनचा जबरदस्त लुक पहायला मिळत आहे. वरुणच्या आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा वेगळा आणि वरुणला साजेसा हा लुक असल्याचे म्हटले जात आहे. ‘कलंक’ आणि ‘दिलवाले’ या सिनेमानंतर वरुण धवन आणि कृती सेनन पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by BHEDIYA (@varundvn)

भेडियाच्या फर्स्ट लुकमध्ये करुण धवन वेगळ्यात अंदाजात दिसत आहे. अंधारात चमकणाऱ्या डोळ्यांनी वरुण रागात पाहत आहे. त्यामुळे त्याच्याकडे पाहणे थोडे भितीदायक वाटत आहे. वरुणचा असाच काहीसा लुक हा बदलापूर या सिनेमात पहायला मिळाला होता. भेडिया सिनेमातील त्याचा हा पहिला लुक बदलापूर सिनेमाची आठवण करुन देत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, भेडिया हा सिनेमा ‘कॉमेडी हॉरर सिनेमा’ आहे. सिनेमात वरुण हा ‘मिलिट्री ऑफिसर खेत्रपाल’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहे

सिनेमाचे शुटींग हे अरुणाचल प्रदेशच्या घनदाट जंगलात करण्यात आले आहे. खरंतर हा सिनेमा २०२०पूर्वीच रिलीज होणार होता मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिनेमा फार लांबणीवर पडला. सिनेमात मोठ्या प्रमाणात विएफेक्स इफेक्ट्स प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. वरुण धवल आणि कृती सेनन यांच्या व्यतिरिक्त सिनेमात अभिनेते अभिषेक बॅनर्जी आणि दीपक हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

वरुण धवल येत्या काळात भेडिया व्यतिरिक्त ‘जुग जुग जियो’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत असणार आहे. तर अभिनेत्री कृती सेनन ‘बच्चन पांडे’ आणि ‘आदिपुरुष’ या आगामी सिनेमात दिसणार आहे.


हेही वाचा - फराह खानने सांगितलं करण जोहरच्या ‘तरुणपणाचं रहस्य’