घरमनोरंजनवरुण धवनच्या 'भेडिया'ने 2 दिवसांत कमावले इतके कोटी

वरुण धवनच्या ‘भेडिया’ने 2 दिवसांत कमावले इतके कोटी

Subscribe

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री कृति सेननचा आगामी ‘भेडिया’ चित्रपट मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिकने केलं असून चित्रपटात वरुण धवनने लांडगा बनून लोकांना घाबरवताना दिसत आहे. तर अभिनेत्री कृति सेनन या चित्रपटामध्ये डॉक्टर अनिका ही भूमिका साकारत आहे. दरम्यान, नुकत्याच दोन दिवसांपूर्वी हा चित्रपट प्रदर्शित झाला.

‘भेडिया’ने 2 दिवसात कमावले इतके कोटी
वरुण धवनचा ‘भेडिया’ सध्या बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 7.48 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी 9.25 कोटींचा टप्पा पार केला आहे.

- Advertisement -

‘दृश्यम 2’ आणि ‘भेडिया’मध्ये काटे की टक्कर
तब्बू आणि अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ चित्रपटासोबतच कृति सेनन आणि वरुण धवनचा भेडिया देखील नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘दृश्यम 2’मुळे ‘भेडिया’च्या कमाईत वाढ चढउतार होताना दिसत आहे.

दरम्यान,‘भेडिया’ चित्रपट येत्या 25 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार झाला. मीडिया रिपोर्टनुसार, ‘भेडिया’ चित्रपट ‘कॉमेडी हॉरर सिनेमा’ आहे. यामध्ये वरुण एका ‘मिलिट्री ऑफिसर खेत्रपाल’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. चित्रपटाचे शुटींग हे अरुणाचल प्रदेशच्या घनदाट जंगलात करण्यात आले आहे. खरंतर हा चित्रपट 2020 पूर्वीच रिलीज होणार होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट फार लांबणीवर पडला.चित्रपटात मोठ्या प्रमाणात विएफेक्स इफेक्ट्स प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. वरुण धवल आणि कृती सेनन यांच्या व्यतिरिक्त चित्रपटात अभिनेते अभिषेक बॅनर्जी आणि दीपक हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

- Advertisement -

 


हेही वाचा :

अक्षय कुमारसह ‘या’ बॉलिवूड अभिनेत्यांनी वाहिली विक्रम गोखले यांना श्रद्धांजली

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -