घरताज्या घडामोडीपती वरुण धवनला अभिनयात टक्कर देण्यासाठी नताशा दलाल सज्ज; ओटीटीवर करणार पर्दापण

पती वरुण धवनला अभिनयात टक्कर देण्यासाठी नताशा दलाल सज्ज; ओटीटीवर करणार पर्दापण

Subscribe

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या ‘स्टूडंट ऑफ द इअर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता वरुण धवन लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. ‘मैं तेरा हीरो’, ‘कुली नंबर १’, ‘बदलापुर’, ‘स्ट्रीट डांसर ३’, ‘दिलवाले’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘जुडवा २’ सारख्या दमदार चित्रपटात वरुणने काम केले आहे. आता वरुणला अभिनयाच्या रिंगणात टक्कर देण्यासाठी पती नताशा दलाल उतरणार आहे. नताशा दलाल लवकर ओटीटी प्लॅटफॉर्मद्वारे पदार्पण करणार आहे.

माहितीनुसार वरुणची पती नताशा दलाल ओटीटीवर एका शोमध्ये अभिनय करणार आहे. ज्या शोचे नाव ‘से येस टू दी ड्रेस इंडिया’ असे आहे. हा शो डिस्कवरीवर दाखवला जाईल. हा एक डिझाईनिंगवर आधारित शो आहे. नताश दलाल पेशानेसुद्धा फॅशन डिझाईनर आहे, त्यामुळे नताशाने यासाठी होकार दिला आहे.

- Advertisement -

या शोमध्ये नताशा वेडिंग आउटफिट डिझाईन करताना दिसणार आहे. त्यामुळे तिच्या वेडिंग कलेक्शनची झलक या शोच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. दरम्यान नताशाने स्वतः लग्नात देखील घातलेले कपडे स्वतःचं डिझाईन केले होते.

वरुण धवन आणि नताशा जानेवारी २०२१मध्ये लग्नबंधनात अडकले होते. लग्नाबाबत जास्त गाजावाजा न करता अलीबागमध्ये लग्न समारंभ आयोजित केला होता. ज्यामध्ये कुटुंबियातील खास लोकं आणि निवडक बॉलिवूड सेलिब्रिटींना आमंत्रित केले होते. परंतु वरुण आणि नताशाच्या लग्नाची चर्चा खूप झाली. बऱ्याच काळापासून वरुण आणि नताशा एकमेकांना ओळतात आणि बऱ्याच वर्षांपासून ते दोघे रिलेशनशिपमध्ये होते.

- Advertisement -

हेही वाचा – Kylie Jenner billionaire Story: एक किस आणि महिला झाली अब्जाधीश


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -