प्री वेडिंगच्या गोष्टीचा ‘वेडिंगचा सिनेमा’

‘वेडिंगचा शिनेमा’ चा नुकताच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. उत्तम कथा, दर्जेदार अभिनय, खुमासदार संवाद आणि विनोदाची मस्त फोडणी आहे. ट्रेलरबघून अजून चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. 

wedding cha shinema Offical Trailer Photo

डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘वेडिंगचा शिनेमा’ होणार १२ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘वेडिंगचा शिनेमा’ मध्ये मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे या तगड्या कलाकारांची फौज दिसणार आहे. तर शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार ही जोडी प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहे.

wedding cha shinema
वेडिंगचा शिनेमा

‘वेडिंगचा शिनेमा’ चा नुकताच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. उत्तम कथा, दर्जेदार अभिनय, खुमासदार संवाद आणि विनोदाची मस्त फोडणी आहे. ट्रेलरबघून अजून चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. पारंपारिक रितीरिवाजांपासून आधुनिक फॅशन-तऱ्हा आणि पद्धती यांचा मिलाफ आणि त्यातून भरपूर कौटुंबिक मनोरंजन देणारा ‘वेडिंगचा शिनेमा’ १२ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेला टीझर आणि तीन गाणी यांना रसिकांकडून भरपूर प्रतिसाद लाभला आणि चित्रपटाबद्दल खऱ्या अर्थाने हवा निर्माण झाली. आज प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये एका लग्नाची तयारी, त्यासाठी केले जाणारे प्रीवेडिंग चित्रीकरण, घरातील माणसांची नृत्याची तयारी, चालीरीतींवरील चर्चा या गोष्टी ट्रेलरमधून पुढे येतात.

‘आयुष्यावर बोलू काही’ मधील डॉ. सलील कुलकर्णी यांचा सहकारी आणि प्रख्यात कवी संदीप खरे यांनी या चित्रपटाची गाणी लिहिली आहेत. डॉ. सलील कुलकर्णी यांनी ‘वेडिंगचा शिनेमाची कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन या सर्वच आघाड्यांवर स्वतःचे नाणे खणखणीतपणे सिद्ध केले आहे, याचीही प्रचिती प्रेक्षकांना हा चित्रपट देईल.