घरमनोरंजनकरीना, सोनम, स्वरा आणि शिखाने सोडली 'लाज शरम'

करीना, सोनम, स्वरा आणि शिखाने सोडली ‘लाज शरम’

Subscribe

वीरे दी वेडिंगचं आणखी एक गाणं आऊट

लग्नाचे बंधन म्हणजे ‘फासी का फंदा’ वाटणाऱ्या आणि त्यापासून दूर पळणाऱ्या चार मैत्रिणींची गोष्ट असलेला ‘वीरे दी वेडिंग’ सिनेमा सध्या चर्चेचा विषय आहे. करीना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा या चौघींची प्रमुख भूमिका असलेल्या सिनेमाचा ट्रेलर तुम्ही पाहिला असेल, तर तुम्हाला या चार खोडकर, बिनधास्त आणि मनमौजी स्वभावाच्या मुलींचा अंदाज आला असेल. आता तर या चौघींनी चक्क ‘लाज शरम’ सोडली आहे.
गोंधळात पडलात का ? तुम्हाला वाटतं तसं काही नाहीए. ‘वीरे दी वेडिंग’चे आणखी एक गाणं सध्या सोशल मिडियावर ट्रेंड होत आहे. ते म्हणजे ‘छड लाज शरम’. रिलीजनंतर अवघ्या काहीच तासात हे गाणं ट्रेंडिंग लिस्टमध्ये सुद्धा आलं . या सिनेमाचा ट्रेलर आल्यावर हा सिनेमा ‘फुल ऑन एटरटेनिंग’ असणार अशीच प्रतिक्रिया उमटली होती. आता या गाण्यातूनही असचं काहीसं वाटतं आहे.
या आधी या सिनेमातील ‘वीरे’,’भंगडा ता सजदा’,’तारीफा’ ही गाणी आली होती. या गाण्यांनादेखील फॅन्सने चांगला प्रतिसाद दिला. १ जूनला प्रदर्शित होणाऱ्या वीरे दी वेडिंगची उत्सुकता आता शीगेला पोहोचली आहे.

‘वीरे…’तून करीनाचं कमबॅक

- Advertisement -

तैमूरच्या जन्मानंतर करीना ‘वीरे दी…’ वेडिंगमधून कमबॅक करत आहे. तैमूरच्या जन्मानंतर करीनाचे वजन वाढलं होतं. पण फिटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या करीनाने अवघ्या काहीच महिन्यात वजन कमी करत आपला ‘फिट अॅण्ड फ्रेश’ लूक पुन्हा मिळवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -