घरमनोरंजनज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन, वयाच्या 79व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन, वयाच्या 79व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Subscribe

मुंबईमधील एका हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, ते खूप दिवसांपासून आजारी होते

हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे अभिनेते अरूण बाली यांचे आज वयाच्या 79 व्या वर्षी निधन झाले. मुंबईमधील एका हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, ते खूप दिवसांपासून आजारी होते.

अरूण बाली मागील बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे त्यांना काही महिन्यांपूर्वीच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. अरूण बाली मायास्थेनिया ग्रॅव्हिस या दुर्लभ आजारावर इलाज करत होते. मायास्थेनिया ग्रॅव्हिस एक ऑटोइम्यून रोग आहे. हा आजार नर्व्स आणि मसल्समधील कम्युनिकेशन फेलियरमुळे होते.

- Advertisement -

अरूण बाली इंडस्ट्रीमधील उत्तम अभिनेते होते, त्यामुळे त्यांच्या जाण्याने प्रत्येकजण भावूक झाला आहे. अरूण बाली यांच्या निधनाच्या बातमीने इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. अरूण बाली एक हसमुख कलाकार आणि व्यक्ति होते. ज्यांच्या ठिक होण्याची सर्वांनाच आशा होती.

या मालिका आणि चित्रपटांमध्ये केलं होत काम
अरूण बाली यांनी 90 च्या दशकामध्ये आपल्या अभिनयाची सुरूवात केली होती. त्यांनी ‘राजू बन गया जेंटलमॅन’, ‘खलनायक’, ‘फूल और अंगारे’, ‘आ गले लग जा’, ‘सत्या’, ‘हे राम’, ‘ओम जय जगदीश’, ‘केदारनाथ’, ‘लगे रहो मुन्ना भाई’, ‘3 ईडियट्स’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी हिंदी टेलिव्हिजनवरील अनेक मालिकांमध्ये देखील काम केले होते.

- Advertisement -

हेही वाचा :

‘ए वतन मेरे वतन’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार सारा अली खान आणि वरुण धवन

 

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -