घरमनोरंजनDilip Kumar Death: असा होता ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांचा बॉलिवूडमधील प्रवास

Dilip Kumar Death: असा होता ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांचा बॉलिवूडमधील प्रवास

Subscribe

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचे आज सकाळी ७.३० वाजता निधन झाले असून ते ९८ वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. दिलीपकुमार यांच्या निधनाने बॉलिवूडसह जगभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. दिलीप कुमार यांच्यावर मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला होता. परंतु पुन्हा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

दिलीप कुमार यांनी १९४० ते ७० अशी जवळपास तब्बल तीन दशकं त्यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर गाजवली होती. आज भारतीय सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकार त्यांनी आपला आदर्श मानतात. अनेक कलाकारांनी तर त्यांची नक्कल करुन बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. इतका लोकप्रिय असलेला हा अभिनेत्याने वयाच्या ९८ व्या वर्षापर्यंत आजाराशी लढा दिला. वयोमानामुळं गेल्या काही काळात अनेकदा त्यांची तब्येत बिघडली होती. शिवाय दिलीप कुमार यांचे भाऊ असलम आणि एहसान खान यांचे गेल्या वर्षी करोनाच्या संक्रमणाने निधन झाले होते.

- Advertisement -

असा होता ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांचा प्रवास

दिलीपकुमार यांचा जन्म पाकिस्तानमधल्या पेशावरमध्ये झाला होता. त्यांचे मुळ नाव मोहम्मद युसूफ खान असे असले तरी जगभर त्यांना दिलीपकुमार या नावानेच ओळखले गेले. भारतीय चित्रपटांच्या इतिहासात अभिनयाचे विद्यापीठ तसेच ट्रॅजेडी किंग अशी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार हे मुळचे पाकिस्तानमधील पेशावरचे होते. या शहरातील क्‍युसा खवानी बाजारातील पास्तुन कुटुंबात ११ डिसेंबर, १९२२ साली दिलीप कुमार यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव मोहम्मद युसूफ खान होते. त्यांचे वडील लाला गुलाम सरवर पेशावर व देवलाली येथील प्रसिद्ध फळविक्रेते असल्याचे सांगितले जाते. दिलीप कुमार यांचे प्राथमिक शिक्षण नाशिकमधील देवलाली येथील प्रेस्टिजियस बर्नेस शाळेत झाले. १९३० साली त्यांचे संपूर्ण कुटुंब मुंबईत राहण्यास आणि स्थाय़िक झाले. मिळालेल्या माहितीनुसार १९४० मध्ये दिलीप कुमार पुण्यातील एका कॅन्टीनचे मालक आणि फळ विक्रेते होते.

…आणि अभिनयाला सुरूवात

१९४३ साली बॉम्बे टॉकिजचे मालक आणि त्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री देविका राणी आणि तिचा पती हिमांशु राय यांनी पुण्यातील सैन्य कॅन्टीनमध्ये दिलीप कुमार यांना पाहिले आणि त्यांनी १९४४ सालातील ज्वार भाटा या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी दिलीप कुमार यांची निवड केली. हा दिलीप कुमार यांचा पहिला चित्रपट असून त्यानंतर त्यांनी कधीच पुन्हा मागे वळून पाहिले नाही.

- Advertisement -

पुरस्कारांची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

बेस्ट अॅक्टरसाठी सर्वाधिक फिल्मफेअर अवॉर्ड जिंकण्याचं रेकॉर्डही दिलीपकुमार यांच्याच नावावर आहे. दिलीपकुमार हे फक्त अभिनेतेच होते असं नाही तर त्यांनी काही चित्रपटांची निर्मितीही केली. त्यांनी केलेल्या मदतीची, दानशुरपणाचीही दखल विश्वाने घेतली. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना त्यांच्या सिनेसृष्टीतील कार्यकाळात अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यांनी मिळवलेल्या पुरस्कारांची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. दिलीप कुमार यांना आतापर्यंत आठ वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून पद्मभूषण पुरस्कार (१९९१), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९९४), एनटीआर पुरस्कार (१९९७), पाकिस्तान सरकारतर्फे निशान-ए-इम्तियाझ पुरस्कार (१९९८), जीवनगौरवर पुरस्कार फिल्मफेअर, पद्म विभूषण पुरस्कार (२०१५), सीएनएन आयबीएन जीवन गौरव पुरस्कार (२००९) या पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे.

गाजलेले चित्रपट

१९४९ साली प्रदर्शित झालेल्या जुगनू या चित्रपटात त्यांनी नूरजहॉं यांच्यासोबत काम केले होते आणि त्यांचा हा पहिला गाजलेला चित्रपट ठरला. त्यानंतर त्यांचा साहेब (१९४८) चित्रपटाने देखील बॉक्‍स ऑफिसवर कमाल दाखवली. १९४९ साली महमूद खान दिग्दर्शित अंदाज चित्रपटात राज कपूर व नरगिस यांच्यासोबत लव ट्राएंगलमध्ये ते दिसले. त्यानंतर त्यांनी जोगन (१९५०), दीदार (१९५१), दाग (१९५२), देवदास (१९५५), यहुदी (१९५८) आणि मधुमती (१९५८) यासारख्या त्रिकोणी प्रेमकथेवर आधारीत असलेल्या चित्रपटात काम केले. त्यानंतर त्यांना ट्रॅजेडी किंग या नावाने संबोधू लागले. दाग (१९५२) चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेयरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा पुरस्कार त्यांना देवदास (१९५५ ) चित्रपटासाठी प्राप्त झाला. त्याकाळातील सर्व प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत त्यांनी काम केले होते, या यादीत नरगिस, कामिनी कौशल, मीनाकुमारी, मधुबाला व वैजयंती माला या अभिनेत्रींचा समावेश आहे. आन (१९५२) या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटानंतर अंदाज (१९५५), नया दौर (१९५७) आणि कोहिनूर (१९६०) या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. कोहिनूर चित्रपटातील भूमिकेसाठी पुन्हा एकदा फिल्मफेयरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.


Dilip Kumar Passes Away: रुपेरी पडद्यावरचा बादशहा!

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -