Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन अभिनेते दिलीप कुमार यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

अभिनेते दिलीप कुमार यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

. दिलीप कुमार यांना स्ट्रेचरवरुन बाहेर आणले आहे. तसेच दिलीप कुमार यांच्यावर उपचार करणारे डॉक्‍टर जलील पारकर यांनी दिलीप कुमार यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना गेल्या काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दिलीप कुमार काही दिवसांपासून दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली होती. अभिनेते दिलीप कुमार यांची पत्नी सायरा बानो यांनी याबाबत माहिती दिली होती. पण आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिलीप कुमार यांना स्ट्रेचरवरुन बाहेर आणले आहे. तसेच दिलीप कुमार यांच्यावर उपचार करणारे डॉक्‍टर जलील पारकर यांनी दिलीप कुमार यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले आहे. त्यांना काही औषधे देण्यात आली असून त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. रुग्णालयातून बाहेर पडताच माध्यमांशी संपर्क साधत सायरा बनो यांनी दिलीप कुमार यांच्यासाठी  प्रार्थना करा तसेच त्यांना आशीर्वाद द्या, प्रत्येकाचे धन्यवाद असे म्हंटले आहे.

- Advertisement -

दिलीप कुमार यांनी पत्नी सायरा बानो त्यांची खूप काळजी घेत असतात. दिलीप कुमार यांचे अधिकृत ट्वीटर अकाउंटवरून त्यांची पत्नी त्यांच्या आरोग्यासंबंधित माहिती देत असतात.


हे हि वाचा – ‘मास्टर’च्या हिंदी रिमेक मध्ये भाईजानची वर्णी ?

- Advertisement -