घरमनोरंजनज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे निधन

Subscribe

चित्रपटसृष्टी आणि चित्रपटांपासून दूर असलेले कादर खान गेल्या काही वर्षांपासून कादर खान मुलगा सरफराज खान आणि सून शाहिस्ता खान यांच्यासोबत कॅनडामध्येच वास्तव्याला होते.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे निधन झाले आहे. कॅनडामधील हॉस्पिटलमध्ये कादर खान यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी कादर खान यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसापासून कादर खान यांच्यावर कॅनडामध्ये उपचार सुरु होते. कादर खान यांच्या निधनाबाबत त्यांचा मुलगा सरफराज याने माहिती दिली आहे. कॅनडातील वेळेनुसार ३१ डिसेंबरला संध्याकाळी ६ वाजता त्यांचे निधन झाले. ते गेल्या अनेक वर्षापासून आजारी होते. त्यांच्यावर कॅनडामध्येच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. कादर खान यांनी ३०० पेक्षा अधिक चित्रपटामध्ये अभिनयाचे काम केले होते.

चित्रपटसृष्टी आणि चित्रपटांपासून दूर असलेले कादर खान गेल्या काही वर्षांपासून कादर खान मुलगा सरफराज खान आणि सून शाहिस्ता खान यांच्यासोबत कॅनडामध्येच वास्तव्याला होते. कादर खान यांना २८ डिसेंबरला श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे होते. कादर खान यांची प्रकृती गंभीर असल्याची बातमी समजताच, त्यांचे चाहते सोशल मीडियावरुन त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

- Advertisement -

कादर खान यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९३७ रोजी अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये झाला होता. कादर खान भारतीय -कॅनडा वंशाचे होते. ३०० पेक्षा अधिक चित्रपटामध्ये त्यांनी काम केले आहे. १९७० ते १९८० च्या काळात ते प्रसिध्द पटकथा लेखक होते. कादर खान यांनी चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश करण्याआधी सिव्हिल इंजिनिअरच्या विद्यार्थ्यांना शिकवले होते. अभिनेता गोविंदा सोबत त्यांनी जास्त चित्रपट केले असून त्यांचे नातेसंबंध चांगले होते.

हेही वाचा – 

- Advertisement -

कादर खानसाठी बिग बींनी केली प्रार्थना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -