घरट्रेंडिंगअफवावंर विश्वास नको; कादर खान अद्याप व्हेंटिलेटरवर

अफवावंर विश्वास नको; कादर खान अद्याप व्हेंटिलेटरवर

Subscribe

कादर खान यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना त्वरित कॅनडाच्या एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांची प्रकृती सध्या गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. अभिनेते कादर खान यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना उपचारासाछी कॅनडाच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. चित्रपटसृष्टी आणि चित्रपटांपासून दूर असलेले कादर खान गेल्या काही वर्षांपासून आपल्या मुलासोबत कॅनडामध्येच वास्तव्याला होते. आज कादर खान यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना त्वरित रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, ताज्या माहितीनुसार सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. कादर खान यांच्या प्रकृतीबद्दल मुलगा सरफराज खान आणि सून शाहिस्ता खान यांनी ही माहिती दिली आहे. कादर खान यांची प्रकृती गंभीर असल्याची बातमी समजताच, त्यांचे चाहते सोशल मीडियावरुन त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत.

अफवांच्या पोस्ट व्हायरल…

मात्र, दुसरीकडे सोशल मीडियावरील काही लोकांनी कादर खान याचा मृत्यू झाल्याच्या पोस्ट शेअर केल्या आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीसही कादर खान यांची प्रकृती बिघडल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे सोशल मीडियावर काही अति उत्साही लोकांनी त्यांचा मृत्यू झाल्या्च्या पोस्ट व्हायरल केल्या होत्या. आज पुन्हा एकदा कादर खान यांची प्रकृती गंभीर असल्याचं समोर आलं असलं, तरी अद्याप त्यांच्या कुटुंबियांकडून निधनाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या सोशल निधनांच्या अफवांर विश्वास ठेवणं योग्य ठरणार नाही.

 

View this post on Instagram

 

#cholebhaturee #kadarkhan #fan #missyou

A post shared by Chole Bhature Entertainment (@cholebhaturee) on

- Advertisement -


बॉलीवूडचा ‘साईड हिरो’

बॉलीवूडमध्ये स्वत:च्या अभिनयाची छाप उमटवलेले चरित्र अभिनेते कादर खान, यांनी आजवर ३०० हून अधिक चित्रपटांत काम केले आहे. त्यांच्या हिम्मतवाला, आँखे आणि कूली नंबर १ या चित्रपटांना प्रेक्षकांकडून विशेष प्रेम मिळाले. बहुतांशी चित्रपटात कादर खान यांनी सहकलाकार म्हणून काम केले. मात्र, तरीही बरेचदा ते मुख्य हिरोपेक्षा जास्त भाव खाऊन गेले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -