मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मिलिंद सफई यांच्या निधनाची बातमी नुकतीच समोर आली आहे. आज सकाळी 10:45 वाजता मिलिंद यांनी अखेरचा श्वास घेतला. मिलिंद सफई यांचं कॅन्सरने निधन झालं. मिलिंद यांच्या जाण्याने मराठी मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे.
मिलिंद सफई यांनी ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’,’प्रेमाची गोष्ट’, ‘थँक्यू विठ्ठला’, आणि ‘पोस्टर बॉईज’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. तसेच ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेत देखील त्यांनी काम केले होते. ‘आशिर्वाद तुझा एकविरा आई’, ‘सांग तू आहेस का?’, ‘100 डेज’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये मिलिंद यांनी काम केले होते.
- Advertisement -
हेही वाचा :
राष्ट्रीय पुरस्कार पटकावताच अल्लू अर्जुनच्या घरी टीमचे सेलिब्रेशन; व्हिडीओ व्हायरल
- Advertisement -
- Advertisement -