घरताज्या घडामोडीज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल

Subscribe

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची प्रकृती बिघडल्यामुळे मुंबईतील एच.एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याबाबतची माहिती मोठा भाऊ रणधीर कपूर यांनी दिली आहे. ६७ वर्षीय ऋषी कपूर यांना बुधवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रणधीर कपूर यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांना कॅन्सर आणि श्वसन संबंधित आजार आहे. पण सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

त्यांना चेस्ट इन्फेक्शन झाले असून श्वास घेण्यास त्रास होत आहे. तसंच त्यांना ताप असल्यामुळे त्यांची कोविड-१९ चाचणीही केली जाणार असल्याचे वृत्त समोर आलं आहे.

- Advertisement -

ऋषी कपूर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेत कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर सप्टेंबरमध्ये भारतात परतले होते. त्यानंतर त्यांना फेब्रुवारीमध्ये दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

- Advertisement -

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारे ऋषी कपूर यांनी २ एप्रिलपासून ट्विटवर काहीही पोस्ट टाकली नाही आहे. आपल्या एका पोस्टमध्ये त्यांनी अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत येणाऱ्या आगामी चित्रपटाचा उल्लेख केला होता.


हेही वाचा – सामान्य चेहर्‍याचा असामान्य कलाकार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -