घरमनोरंजन'नटसम्राट'पासून 'हम दिल दे चुके सनम'पर्यंत विक्रम गोखलेंचे मनोरंजन सृष्टीत मोठे योगदान

‘नटसम्राट’पासून ‘हम दिल दे चुके सनम’पर्यंत विक्रम गोखलेंचे मनोरंजन सृष्टीत मोठे योगदान

Subscribe

मराठीसह हिंदी आणि अन्य भाषिक चित्रपटसृष्टीत आपल्या अष्टपैलू अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (७७) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी सकाळी निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून होते. मात्र बुधवारपासून त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि ते उपचारांना प्रतिसाद देईनासे झाले. अखेर आज शनिवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी त्यांचे कुटुंबीय त्यांच्याजवळ होते. विक्रम गोखले यांच्या पश्चात पत्नी वृषाली आणि दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

विक्रम गोखले यांचे मनोरंजन सृष्टीला मोठे योगदान

विक्रम गोखले यांनी मालिका, नाटक आणि चित्रपट या तिन्ही मनोरंजन क्षेत्रात आपल्या अभिनयाची वेगळी छाप निर्माण केली. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात मोलाचे स्थान निर्माण केले. रंगभूमीचा एक मोठा काळ त्यांनी गाजवला. त्यांनी अभिनयासोबत लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही आपली मोहर उमटवली. सध्या विक्रम गोखले तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. काही वर्षांपूर्वी अग्निहोत्री मालिकेतून विक्रम गोखले प्रेक्षकांसमोर आले. या हे मालिकेतील पात्रही आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

- Advertisement -

विक्रम गोखले यांनी हिंदी- मराठीतील अनेक चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.

नटसम्राट

- Advertisement -


2016 साली प्रदर्शित झालेल्या नटसम्राटमध्ये विक्रम गोखले यांनी उत्तम भूमिता साकारली होती.

गोदावरी


नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गोदावरी चित्रपटामध्ये देखील विक्रम गोखले यांनी महत्वाची भूमिका साकारली होती.

AB आणि CD


AB आणि CD या चित्रपटामध्ये विक्रम गोखले अमिताभ यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसले होते.

मिशन मंगळ

निळकंट मास्तर

माहेरची साडी

बाळा गाऊ कशी अंगाई

हम दिल दे चुके सनम


हेही वाचा :

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत खालावली, रुग्णालयात उपचार सुरु

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -