घरमनोरंजनज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन; वयाच्या 65व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन; वयाच्या 65व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Subscribe

मराठी रंगभूमीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन झालं आहे. ते 65 वर्षांचे होते. गिरगाव येथील राहत्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. यात मराठी नाट्यक्षेत्रात त्यांनी आपला वेगळाच दबदबा निर्माण केला. ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकामुळे त्यांना मनोरंजन सृष्टीमध्ये एक वेगळीच ओळख मिळाली होती. मात्र प्रदीप पटवर्धन यांच्या अकाली निधनामुळे सिनेसृष्टीतून  शोक व्यक्त करण्यात येत आहे.

प्रदीप पटवर्धन यांनी आत्तापर्यंत नवरा माझा नवसाचा, चश्मे बहाद्दर, एक दोन तीन चार, लावू का लाथ, भुताळलेला, नवरा माझा भवरा, डोम, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, जमलं हो जमलं, एक शोध अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये काम केले. गोळा बेरीज, बॉम्बे वेल्वेट, व टू थ्री फोर, जर्नी प्रेमाची, परिस, थँक यू विठ्ठलामध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची चुनूक दाखवली.

- Advertisement -

मोरूची मावशी हे त्यांचे प्रचंड गाजलेले नाटक. या नाटकामुळे ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचले. एक विनोदी अभिनेते म्हणून प्रदीप पटवर्धन यांना ओळखले जायचे. विनोदाचे टायमिंग व हजरजबाबीपणा यामुळे त्यांनी रसिकांवर आपली वेगळी छाप निर्माण केली होती. मराठीतील मालिका आणि चित्रपटातही वेगवेगळ्या धाटणीच्या उत्तम भूमिका साकारल्या. त्यासोबतच अनेक दर्जेदार नाटकातही त्यांनी अभिनय केला.


‘भारत रंग महोत्सव, केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचा उपक्रम

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -