Mihir Das: दिग्गज अभिनेते मिहिर दास यांचे वयाच्या 63 व्या वर्षी निधन

मिहीर यांनी तीन दशकांहून अधिका काळ सिनेसृष्टीसाठी दिला आहे. १९९८मध्ये लक्ष्मी प्रतिमा या सिनेमातून त्यांच्या करिअरला सुरुवात झाली. तर २००५मध्ये फेरिया मो सोमा भाउनी या सिनेमासाठी मिहीर यांना राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला होता

Veteran Odia actor Mihir Das passes away
Mihir Das: दिग्गज अभिनेते मिहिर दास यांचे वयाच्या 63 व्या वर्षी निधन

दिग्गज अभिनेते मिहीर दास यांचे निधन (Veteran Odia actor Mihir Das passes away ) झाल्याची दुख:माहिती समोर आली आहे. वयाच्या 64व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कटक शहातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मिहीर दास हे गेल्या अनेक वर्षांपासून किडनीच्या आजाराने ग्रस्त होते. त्याचप्रमाणे त्यांच्यावर डायलिसीसचे उपचार देखील सुरू होते.10 डिसेंबर पासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

मिहीर यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी देखील त्यांच्या जाण्याने दुख: व्यक्त केले आहे. उडिया सिनेमासाठी मिहीर यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते असे म्हणत नवीन पटनायक यांनी ट्विट करत मिहीर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 10 डिसेंबरपासून मिहीर यांची प्रकृती बिघडली होती त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला होता. मात्र डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते. मात्र त्यांना मृत्यूशी सामना करावाच लागला.

मिहीर यांनी तीन दशकांहून अधिका काळ सिनेसृष्टीसाठी दिला आहे. १९९८मध्ये लक्ष्मी प्रतिमा या सिनेमातून त्यांच्या करिअरला सुरुवात झाली. तर २००५मध्ये फेरिया मो सोमा भाउनी या सिनेमासाठी मिहीर यांना राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला होता. असे असले तरी पुआ मोरा भोलाशंकर या सिनेमाने त्यांना खरी ओळख निर्माण करुन दिली.

मिहीर दास यांना २००७मध्ये मु तावे लव करुचीचा सर्वोकृष्ट विनोदी अभिनयासाठी पुरस्कार मिळाला होता. तर २०१०मध्ये त्यांना प्रेम अधे व्याख्यानात सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला होता. केवळ सिनेमाच नाही तर मिहीर हे टेलिव्हिजन क्षेत्रातही फार लोकप्रिय होते.


हेही वाचा – ‘स्कूटर वाल्यावर प्रेम का केलंस?’, दोन मुलं झाल्यावर Kapil Sharmaचा बायकोला प्रश्न