घरमनोरंजनविक्कीने केली हेमा मालिनीसोबत कतरिनाची तुलना म्हणाला... ती देखील

विक्कीने केली हेमा मालिनीसोबत कतरिनाची तुलना म्हणाला… ती देखील

Subscribe

बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल सध्या त्याच्या ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. विक्कीच्या या चित्रपटाने ओटीटीवर धमाल केली आहे. प्रेक्षक या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद देत आहेत. याचं दरम्यान, आता विक्की कौशलची एक मुलाखत समोर आली आहे. जी सध्या प्रचंड चर्चेत आहे. या मुलाखतीमध्ये विक्कीने पत्नी कतरिनाबाबत एक वक्तव्य केलंय जे सध्या खूप चर्चेत आहे. खरंतर या मुलाखतीमध्ये विक्कीने कतरिनाची तुलना बॉलिवूडमधील एका दिग्गज अभिनेत्रीशी केली आहे.

‘या’ अभिनेत्रीसोबत केली कतरिनाची तुलना

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

- Advertisement -

जेव्हापासून विक्की आणि कतरिनाचं लग्न झालं आहे. तेव्हापासून त्यांची जोडी सतत चर्चेत असते. विक्की कतरिनाबद्दल अनेक गोष्टी सांगताना दिसतो. याचं दरम्यान, एका मुलाखतीत विक्कीने कतरिनाचं खूप कौतुक केलं आहे. त्यावेळी तो म्हणाला की, “कतरिना कैफ आज जी पण आहे. तिच्या ताकदीवर आहे. तिने यासाठी खूप मेहनत केली आहे. मी तिचा मनापासून आदर करतो. मी आणि कतरिना एकमेकांचा आदर करतो.” त्यानंतर विक्कीने विक्कीने कतरिनाची हेमा मालिनीसोबत तुलना केली. त्यावेळी तो म्हणाला की, “कतरिना देखील हेमा मालिनींप्रमाणे बॉलिवूडला इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर रिप्रेजेंट करते.”

दरम्यान, 2021 मध्ये विक्की आणि कतरिनाचं लग्न झालं होतं. तेव्हापासून ही जोडी सतत चर्चेत असते.

- Advertisement -

कतरिनाचे आगामी प्रोजेक्ट

कतरिना सलमान खानच्या ‘टायगर 3’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. तसेच आलिया भट्ट आणि प्रियांका सोबत कतरीना ‘जी ले जरा’मध्ये देखील दिसणार आहे.

 


हेही वाचा :

फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स : ‘रॉकेट बॉईज’ला 6 पुरस्कार; ‘पंचायत 2’ आणि ‘दसवी’चा सुद्धा जलवा

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -