घरमनोरंजनVicky-Katrina Wedding : विकी- कतरिनाचे लग्न वादाच्या भोवऱ्यात, दोघांविरोधात गुन्हा दाखल

Vicky-Katrina Wedding : विकी- कतरिनाचे लग्न वादाच्या भोवऱ्यात, दोघांविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. राजस्थानच्या सवाई माधोपूर किल्ल्यावर दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. मात्र लग्नापूर्वीच दोघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय. राजस्थानच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकारणाकडे ही तक्रार नोंदवण्यात आलीय. त्यामुळे दोघेही लग्नपूर्वीत अडचणीत सापडणार असल्याचे बोलले जातेय.

राजस्थानच्या सवाई माधोपूरमधील एका भव्य हॉटेलमध्ये विकी-कतरिना विवाह बंधनात अडकणार आहे. दोघे ज्या हॉटेलमध्ये लग्न करणार आहेत ते हॉटेल सवाई माधोपूरच्या चौथमधील बरवाडा येथे आहे. याच ठिकाणी प्रसिद्ध चौथ मातेचे मंदिर आहे. मात्र कतरिना आणि विकीच्या लग्नामुळे मंदिराकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलाय. त्यामुळे विकी-कतरिनाच्या लग्नाच्या कार्यक्रमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सवाई माधोपूरमधील नेत्रबिंदु सिंह जादौन यांनी विकी आणि कतरिनाविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केलीय. या तक्रारीमध्ये तक्रारदाराने कतरिना, विकीसह सवाई माधोपूरचे कलेक्टर आणि हॉटेल सिक्स सेन्स फोर्ट बरवडा व्यवस्थापनाचे नाव घेतले आहे.

विक्की आणि कतरिना आपल्या कुंटुंबासह राजस्थानमधील सवाई माधोपूरकडे रवाना झालेत. आज दोघांचा संगीत सोहळा होणार असल्याचे सांगितले जातेय. अशातच ही तक्रारीमुळे कतरिना विकी वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

- Advertisement -

तक्रारदाराने राजस्थानच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात ही तक्रार दाखल केली आहे. यात तक्रारदाराने म्हटले की, कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नामुळे प्रसिद्ध चौथ माता मंदिराच्या दिशेने जाणारा रस्ता बंद झालाय. हा रस्ता ६ डिसेंबर ते १२ डिसेंबरदरम्यान बंद ठेवण्यात आलाय. मात्र या मार्गावरून चौथ मातेच्या मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. परंतु हा रस्ता बंद केल्याने पुढील सात दिवस भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे भाविकांसाठी चौथ माता मंदिरापर्यंतचा रस्ता लवकरात लवकर सुरळीत करावा. या तक्रारीचा अर्ज राजस्थान जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि सचिवांकडे सोपवण्यात आलाय. मात्र तक्रारीनंतर काय कारवाई झाली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

दरम्यान ८ डिसेंबरला कतरिना- विकीचा मेहंदी सोहळा पार पडणार आहे तर ९ डिसेंबरला दोघं विवाह बंधनात अडकणार आहेत. मात्र विकी आणि कतरिना या शाही विवाहसोहळ्या आधी कोर्ट मॅरेज करणार असल्याचे म्हटले जातेय.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -