विक्की कौशल आणि कतरिना यांच्या कारच्या नंबर प्लेटची चर्चा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

गाड्यांचे नंबर हे विकी आणि कतरिना यांच्या प्रेमाची निशाणी

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना आणि अभिनेता विक्की कौशल सध्या त्यांच्या रिलेशनशिपमुळे चांगलेच चर्चेत आहेत. दोघांच्या लग्नाच्या चांगल्याच चर्चा रंगताना पहायला मिळत आहेत. लवकरचं ते लग्नबंधनाच अडकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कतरिना आणि विक्की यांना अनेक इव्हेंट्समध्ये एकत्र स्पॉट करण्यात आले आहेत. दोघेही डेटींग करत असल्याचे दिसत आहेत. ऐवढेच नाही तर दोघांनी एका कार्यक्रमात गुपचूप साखरपूडा उरकल्याचे देखील म्हटले जात आहे. दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू असताना आता दोघांविषयी एका नवीन विषयावर चर्चा रंगली आहे ती म्हणजे दोघांच्या कारची नंबर प्लेट. सध्या दोघांच्या कारच्या नंबर प्लेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)


विक्की आणि कतरिना यांच्या कारचे नंबर योगेश शहा या फोटोग्राफरने शेअर केले आहेत. ज्यात कतरिनाच्या कारचा नंबर ८८२२ आहे आणि विक्की कौशलच्या गाडीचा नंबर ७७२२ अशा आहे. दोघांच्या गाड्यांच्या नंबरमध्ये फारच साम्य आहे. दोघांच्या नंबरच्या शेवटी २२ हा आकडा कॉमन आहे. विकी आणि कतरिना रिलेशनमध्ये असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या गाड्यांचे नंबर हे विकी आणि कतरिना यांच्या लव्ह स्टोरीशी कनेक्ट असल्याचे काही युझर्सनी म्हटले आहे. तर काहींनी हे नंबर त्यांच्या प्रेमाची निशाणी असल्याचे देखील म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कतरिना आणि विक्की कौशल येत्या ७,८ आणि ९ डिसेंबरला विवाहबंधनात अडकणार आहेत. राजस्थानच्या रणथंबोर या ठिकाणी दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्या लग्नांची चर्चा सुरू असून चाहते देखील दोघांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.


हेही वाचा – रणबीर कपूर आणि आलिया भट्ट डिसेंबरमध्ये बांधणार लग्नगाठ