Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'लस्ट स्टोरीज'नंतर कियारा अडवाणी आणि विकी कौशल पुन्हा दिसणार एकत्र

‘लस्ट स्टोरीज’नंतर कियारा अडवाणी आणि विकी कौशल पुन्हा दिसणार एकत्र

विकी आणि कियारा हे दोघेही एका नवीन चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ह्या पूर्वी हे दोघे लस्ट स्टोरिज या वेबसिरिजमध्ये एकत्र काम करताना दिसले होते.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी ने हिंदी चित्रपटसृष्टीत अत्यंत कमी कालावधीतच आपले स्थान निर्माण केले आहे. ‘भूलभूल्लैया २’ या चित्रपटानंतर ती आता एका नवीन चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अभिनेता ‘विकी कौशल’ हा कियारा सोबत या चित्रपटात दिसेल. वेबसिरिज ‘लस्ट स्टोरीज’ नंतर विकी आणि कियारा पुन्हा एकत्र झळकणार आहे. सध्या कियारा आणि विकी कौशल दोघोही कामात व्यस्त आहे. पण आता लवकरच ते त्यांच्या या आगामी चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात करण्याची शक्यता आहे.

कियारा आणि विकी हे दोघे लवकरच दिग्दर्शक शशांक खेतानचा चित्रपट ‘मिस्टर लेले’ मध्ये दिसणार आहे. या वर्षीच्या अखेरपर्यंत हा चित्रपट फ्लोअरवर जाईल. विकी कौशल आणि कियारा अडवाणी हे दोघेही या चित्रपटात रोमान्स करताना प्रेक्षकांना दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

- Advertisement -

 कियारा अडवाणीही आता जूगजूग जिओ, शेरशाह आणि भूलभूल्लैय २ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. कियारा ही नुकतीच इंदु की जवानी या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने इंदु ची भूमिका केली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. कियाराने २०१४ साली ‘फगली’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. मात्र तिला एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी चित्रपटातून ओळख मिळाली होती. त्यानंतरर ती २०१९ साली शाहिद कपूरसोबत कबीर सिंग या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट तिच्यासाठी लकी ठरला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलेच यश मिळाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

- Advertisement -

विकी कौशलबद्दल सांगायचं झालं तर तो आता अश्वत्थामा, सारे जहॉं से अच्छा, सैम, सरदार उधम सिंग आणि तख्तमध्ये दिसणार आहे. यापूर्वी कौशल हा भूत या चित्रपटात शेवटचा दिसला होता.


हे वाचा- जान्हवीचा लाखमोलाचा ड्रेस

- Advertisement -