Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनVicky Kaushal : छावाच्या प्रमोशनसाठी विकी कौशलची मराठी मालिकेत एंट्री

Vicky Kaushal : छावाच्या प्रमोशनसाठी विकी कौशलची मराठी मालिकेत एंट्री

Subscribe

स्टार प्रवाह वाहिनीवरील जवळपास सर्व मालिका प्रेक्षक आवडीने पाहतात. यांपैकी एक मालिका म्हणजे घरोघरी मातीच्या चुली. सध्या या मालिकेतील ‘श्री आणि सौ’ स्पर्धेचा ट्विस्ट प्रेक्षकांना भावला आहे. या ट्विस्टदरम्यान आता प्रेक्षकांना एक खास सरप्राईज मिळणार आहे. बहुचर्चित ‘छावा’ या सिनेमाचं सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे आणि यानिमित्त अभिनेता विकी कौशल ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत दिसणार आहे. याबाबत माहिती देणारा एक खास व्हिडीओ वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर शेअर करण्यात आला आहे. (Vicky Kaushal Guest Appearance in Gharoghari Matichya Chuli Serial)

मराठी मालिकेत झळकणार विकी कौशल

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये जानकी आणि ऋषिकेशच्या भेटीला एक खास पाहुणा येणार आहे. हा खास पाहुणा म्हणजे अभिनेता विक्की कौशल. त्याचा ‘छावा’ हा सिनेमा येत्या १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी सिनेमाचे प्रमोशन सुरू झाले आहे. यानिमित्त विकी कौशलने ‘घरोघरी मातीच्या चुली’च्या सेटला भेट दिली. या मालिकेत सुरू असलेल्या ‘श्री आणि सौ’ स्पर्धेसाठी जानकी-ऋषिकेशला प्रोत्साहन देताना विक्कीने त्यांना खास टिप्ससुद्धा दिल्या आहेत.

खेळ असो वा लढाई..

यावेळी जानकी- ऋषिकेशला उत्साह वाढवताना विकीने म्हटले, ‘खेळ असो नाहीतर लढाई, हिंमत कधी हरायची नाही. खेळ जर जिंकायचाच असेल तर गनिमी काव्यानेसुद्धा जिंकता येतो. लढाई आपल्या माणसांच्या भरोशावर लढायची असते’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

‘आपल्या टीमला सोबत घेऊन लढायची असते आणि जगात नवरा बायकोपेक्षा भारी टीम दुसरी कुठलीच नसते. तेव्हा जिद्दीने लढा द्या’. यासोबत विकीने त्यांना ‘छावा’ सिनेमा पाहण्याचे आमंत्रण देखील दिले आहे.

सुमित- रेश्माचा फॅन मूमेंट

‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील जानकी आणि ऋषिकेश म्हणजेच रेश्मा शिंदे आणि सुमीत पुसावळे यांनी विकीसोबत शूट करण्याचा अनुभव सांगितला आहे. यावेळी त्यांनी म्हटले, ‘विक्कीसोबत शूटिंगचा दिवस कायम स्मरणात राहील. सुरुवातीला त्याच्यासोबत काम करण्याचं दडपण आलं होतं. पण हे दडपण त्याने दूर केलं. त्याच्याकडून खूप गोष्टी शिकलो. मराठी भाषेवर त्याचं विशेष प्रेम दिसलं. मालिकेतला सीन मराठीत असल्यामुळे शूटिंगआधी त्याने टीमशी संवाद साधला. मालिकांचं शूट कसं होतं? उच्चार कसे असावे? याबाबत माहिती घेतली. आम्हा सर्वांसाठीच ही फॅन मूमेंट होती’.

हेही पहा –

Lakshmi Niwas : लक्ष्मी निवासची जान्हवी म्हणतेय, माझी कास्टिंग सर्वांत शेवटी झाली