Vicky Kaushal Katrina Kaif Wedding: काय सांगता! कतरिनाने लग्नासाठी बुक केलीय १४ लाखांची खोली

राजस्थानच्या २०० वर्ष जुन्या किल्ल्यावर विकी आणि कतरिनाचा विवाह होणार आहे.

अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांची लगीन घटीका समीप आली आहे. दोघांच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्यातच आता एक नवीन खुलास समोर आला आहे तो म्हणजे कतरिना आणि विक्की लग्नात चक्क १४ लाखांची सुट (खोली) बुक केली आहे. सुटची खबर वाचून सगळ्यांच्याच भुवया उंचवल्या आहेत. कतरिनाने लग्नासाठी राजा मानसिंह आणि राणी पद्मावतीचा सुट बुक केला आहे. लग्नात विकी आणि कतरिना शाही पोशाखात दिसणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार विक्की आणि कतरिना ज्या सुटमध्ये राहणार आहेत त्याचं एका रात्रीचं भाडं तब्बल ७ लाख रुपये इतकं आहे.

विक्की कौशल आणि कतरिना हॉटेलवर दाखल झाल्यानंतर हॉटेलची सुरक्षा वाढवण्यात येणार आहे. कोरोनामुळे कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पडणार आहे. कतरिना हॉटेलमधील पद्मावत सुटमध्ये राहणार आहे. या खोलीत एक क्विन साइज बेड आणि स्विमींग पूल आहे. सुटमधून राजस्थानचा संपूर्ण नजारा पाहता येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कतरिना लग्नात प्रत्येक विधीला एका वेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे. राजस्थानच्या २०० वर्ष जुन्या किल्ल्यावर विकी आणि कतरिनाचा विवाह होणार आहे. विकी आणि कतरिनाच्या लग्नाची संपूर्ण थीम ही राजस्थानी पद्धतीची असणार आहे दिसून आले. बॉलिवूडचं हे कपल लग्नात कसं दिसणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

विक्की आणि कतरिनाचा हा शाही विवाह सोहळा राजस्थानच्या सिक्स सेंस हॉटेलमध्ये पार पडणार आहे. कतरिना आणि विक्कीचे कुटुंबीय ६ डिसेंबरला हॉटेलवर जाणार आहेत. ७ डिसेंबरपासून लग्नविधी सुरू होणार आहेत. ९ डिसेंबरला विक्की कौशल कतरिना यांचा शाही विवाहसोहळा रंगणार आहे.


हेही वाचा – Arunachal Pradesh Brand Ambassador : एकेकाळी मी जेलमध्येही दिवस काढलेत… तुम्ही तर, संजय दत्त झाला व्यक्त