घरताज्या घडामोडीVicky Kaushal-Katrina Kaif Wedding: विक्की कौशल कतरिनाच्या लग्नाचे सात फेरे ८०० वर्ष...

Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding: विक्की कौशल कतरिनाच्या लग्नाचे सात फेरे ८०० वर्ष जुन्या किल्ल्यात

Subscribe

७ ते १२ डिसेंबर पर्यंत या ठिकाणी लग्नाविधी पार पडणार

बॉलिवूडमधील सध्याचे चर्चेत असलेले कपल म्हणजे कतरिना आणि विकी कौशल. दोघांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. विकी आणि कतरिना राजस्थानच्या सवाई माधोपुर जिल्ह्यातील सिक्स सेंस बरवाडा फोर्ट हॉटेलमध्ये लग्न करणार आहे. चौथच्या बरवाडा येथे असलेले हे हॉटेल म्हणजे एक किल्ला आहे. किल्ल्याचे रुपांतर एका आलिशान हॉटेलमध्ये करण्यात आले आहे. हा किल्ला १४व्या शतकात बांधण्यात आला आहे. जवळपास ८०० वर्ष जुन्या किल्ल्यात विकी आणि कतरिना सात फेरे घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,विकी आणि कतरिनाने या हॉटेलमध्ये अडवान्स पेमेंट देखील केले आहे. ७ ते १२ डिसेंबर पर्यंत या ठिकाणी लग्नाविधी पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्याच्या मुख्यालयापासून जवळपास २५ किलोमीटरवर हा चौथचा बरवाडा किल्ला आहे. किल्ल्यावरच एक सिक्स सेंस हॉटेल असून या ठिकाणी शाही विवाह सोहळ्यांचे कार्यक्रम होत असतात.

- Advertisement -

हा किल्ला पहिल्यांदा बरवाडाच्या संरपंचांकडे होता. त्यांनी हा किल्ला ओसमॉस या कंपनीला विकला. या कंपनीने या किल्ल्याचे रुपांतर एका आलिशान हॉटेलमध्ये केले. सिक्स सेंस ग्रुपने हे हॉटेस भाडेतत्तावर घेतले आहे.

विकी आणि कतरिना लग्न करणाऱ्या या ८०० वर्ष जुन्या किल्ल्यावर तयार करण्यात आलेल्या आलिशान हॉटेलचे १५ ऑक्टोबर रोजी उद्घाटन करण्यात आले आहे. हॉटेलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला अभिनेत्री मलायका अरोरा उपस्थित होती.

हॉटेलच्या उद्घाटनानंतर पहिल्यांदाच हॉटेलवर विक्की कौशल आणि कतरिना यांचा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. सिक्स सेंस बरवाडा या लक्झरी हॉटेलमध्ये जवळपास शंभर खोल्या आहेत. हॉटेलचे एका दिवसाचे भाडे हे जवळपास १ लाख रुपये इतके असल्याचे सांगण्यात येत आहे.


हेही वाचा – ‘लपाछपी’ या मराठी भयपटाचा हिंदी रिमेक ‘छोरी’ अँमेझॉन प्राइमवर पाहता येणार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -