Vicky-Katrina लग्नानंतर पहिल्यांदाच करणार एकत्र काम

विक्की आणि कतरिना लग्नानंतर एका हेल्थ प्रोडक्टच्या जाहिरातीत एकत्र दिसणार

Vicky kaushal Katrina kaif working together for the first time after marriage
विकी कतरिना लग्नानंतर पहील्यांदाच करणार एकत्र काम

बॉलिवूडचं नुकतच लग्न झालेलं कपल विक्की आणि कतरिना नुकतेच मुंबईत परतले आहेत. लग्नानंतर कोणताही ब्रेक न घेता विक्की कतरिना लगेचच कामाला लागणार आहेत. दोघेही एकाच प्रोजेक्टवर काम करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. लग्नानंतर दोघांना एकमेकांपासून दूर राहण्याची अजिबात इच्छा नाही त्यामुळे लग्नानंतर दोघांनी एकच प्रोजेक्ट साइन केला आहे. लवकरच या प्रोजेक्टचं काम देखील सुरू होईल. खरंतर विक्की कतरिना यांनी एकत्र काम केलेलं नाही त्यामुळे त्यांचे चाहते देखील त्यांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी आतूर आहेत.

विक्की आणि कतरिना लग्नानंतर एका हेल्थ प्रोडक्टच्या जाहिरातीत एकत्र दिसणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार दोघेही लवकरच या जाहिरातीच्या शुटींगला सुरुवात करणार आहेत. विक्की आणि कतरिना या जाहिरातीतून एक लक्झरी प्रोडक्ट प्रमोट करताना दिसणार आहेत.

बॉलिवूडमध्ये लग्नानंतर एकाच जाहिरातीत काम करणारे विक्की आणि कतरिना ही पहिली जोडी नसून याआधीही बॉलिवूडमधील नवीन लग्न झालेल्या जोड्यांनी जाहिरातीसाठी काम केलं आहे. लग्नानंतर विराट अनुष्का, दीपिका रणवीर यांनी ही एकत्र जाहिराती केल्या होत्या. त्याचप्रमाणे लोक आलिया आणि रणबीर यांच्या जोडीला देखील पसंती देतात त्यांनी देखील एकाच जाहिरातीसाठी एकत्र काम केले आहे.

विक्की कतरिना आता लवकरच जाहिरातीतून एकत्र दिसणार आहेत. मात्र दोघांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे चाहते आतूर आहेत. दोघांनी सिनेमात एकत्र काम करावे अशी सर्वांची इच्छा आहे. येत्या काळात कतरिना सलमान खानच्या ‘टायगर ३’ सिनेमात दिसणार आहेत. तर विक्की कौशल ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’ आणि ‘गोविंदा नाम मेरा’ या सिनेमात दिसणार आहे.


हेही वाचा – Kareena kapoor: कोविडचे नियम सांभाळत करिना सैफची कॉफी डेट, पहा फोटो